आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त करणार; पंतप्रधानांची ग्वाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी ‘क्षयरोगमुक्त भारत’ अभियानाची सुरुवात झाली. वर्ष २०२५ पर्यंत भारत क्षयरोगमुक्त करण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे पंतप्रधानांनी या वेळी बोलताना सांगितले. हे उद्दिष्ट पूर्ण होण्याचा विश्वास मोदींनी व्यक्त केला. यासाठी आयुर्वेदिक संशोधनाची व्याप्तीदेखील वाढवण्यात येणार आहे.

 

क्षयरोगावर आयुर्वेदिक आैषधी प्रभावी ठरू शकतील, असे ते म्हणाले. येथील विज्ञान भवनात आयोजित दिल्ली एंड-टीबी परिषदेत ते बोलत होते. जगात अनेक ठिकाणी क्षयरोगावर निर्मित प्रभावी आैषधे अपयशी ठरली आहेत. सप्टेंबर २०१८ मध्ये संयुक्त राष्ट्रात क्षयरोगावर उच्चस्तरीय बैठक होईल.  


‘प्रत्येक क्षयरोग रुग्णावर उपचार झाले पाहिजेत. हे उपचार वेळेत देणे गरजेचे आहे,’ असे ब्रीदवाक्य क्षयरोगमुक्त भारत अभियानाचे असेल. या अभियानासाठी गरज पडल्यास खासगी क्षेत्राचीही मदत घेण्यात येईल. पंचायत राज व्यवस्थेतील तिन्ही स्तरांना यात सक्रिय करून घेण्यात येईल. दारिद्र्य रेषेखालील रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. २५ वर्षांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने क्षयरोग निर्मूलन अभियान हाती घेतले होते, असे मोदी या वेळी बोलताना म्हणाले. तेव्हापासून अनेक देश याविरुद्ध लढत आहेत. मात्र त्याचे निर्मूलन करण्यात आपल्याला यश आले नसल्याचे ते म्हणाले. आजही देशात या राेगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत.

 

नवी पद्धत अवलंबणार, १० कोटी डॉलर्सचा निधी
क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी केंद्र या अभियानांतर्गत नवी पद्धत अवलंबणार आहे. यासाठी राष्ट्रीय धोरण आखण्यात आले आहे. जागतिक स्तरावर क्षयरोग निर्मूलनासाठी २०३० पर्यंतची मुदत घोषित केली असून भारताने २०२५ चे उद्दिष्ट ठेवले आहे. प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना यासंबंधी पत्र दिले असल्याचे मोदी म्हणाले. १० कोटी अमेरिकी डॉलर्सचा निधी यासाठी दरवर्षी मंजूर केला आहे. यामध्ये पोषक आहाराचा समावेशही आहे.

 

 

बातम्या आणखी आहेत...