आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील 24 देशांत भारताचे 121 मोस्ट वाँटेड; 50%, आर्थिक गुन्ह्यांत सामील

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली -  ब्रिटन पळून गेलेल्या भारतीय आरोपींसाठी आवडीचे ठिकाण बनत चालला आहे. पंजाब नॅशनल बँकेला १२ हजार ६३६ कोटी रुपयांचा चुना लावून हिरा व्यापारी नीरव मोदीने ब्रिटनकडे राजकीय आश्रय मागितला आहे. नीरवच्या अगोदर ब्रिटनमध्ये भारताचे अनेक आरोपी दडून बसलेले आहेत. त्यात ललित मोदी, विजय मल्ल्या, संगीत दिग्दर्शक नदीम शैफी, टायगर हनिफ, संजीव चावला, रवि शंकरन, लॉर्ड सुधीर चौधरी, राजकुमार पटेल, राजेश कपूर, अब्दुल शाकूरसारखी नावे समाविष्ट आहेत. २०१३ पासून आतापर्यंत भारतातून पलायन केलेल्यांमध्ये ५ हजार ५०० पेक्षा जास्त लोकांनी ब्रिटनकडे राजकीय आश्रयासाठी अर्ज केले आहेत. त्यात सर्वच्या सर्व गुन्हेगार नाहीत.   भारताचे १२१ मोस्ट वाँटेड गुन्हेगार जगातील २४ देशांत वास्तव्याला आहेत. त्यानंतर अमेरिका, यूएई, कॅनडाचा क्रमांक लागतो.

 

सर्वात जास्त १३५०० कोटी रुपये घेऊन नीरव माेदीचे पलायन   

नीरव मोदी, मल्ल्या, मेहुल चौकसे, जतीन मेहता, ललित मोदीसह ३१ भारतीय गुन्हेगारांनी देशातून ४० हजार कोटी रुपयांहून जास्त रक्कम घेऊन पोबारा केला. हा पैसा बँका किंवा सार्वजनिक संस्थांचा आहे. हे ३१ नावे घोटाळा व आर्थिक गुन्ह्यांशी संबंधित आहेत. त्यांच्यावर ईडी व सीबीआयने १५ वेगवेगळ्या प्रकरणांत खटले दाखल केले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने एप्रिलमध्ये लोकसभेत मांडलेल्या अहवालात या नावांचा उल्लेख होता.   

 

का - ब्रिटन लोकांसाठी सुरक्षित जागा आहे ?   
युरोपियन कन्व्हेन्शन ऑन ह्युमन राइट्सवर (ईसीएचआर) ब्रिटनने स्वाक्षरी केली आहे. त्या अंतर्गत प्रत्यार्पण केल्यानंतर सदर व्यक्तीचा छळ होईल किंवा मृत्युदंड होण्याची शक्यता आहे किंवा राजकीय कारणांनी काही होत असल्याचे वाटल्यास ब्रिटनचे न्यायालय प्रत्यार्पणाचा अर्ज फेटाळू शकतात. त्यामुळे ही जागा गुन्हेगारांना सुरक्षित वाटत असावी.      


कोणाला ब्रिटनमध्ये आश्रय मिळू शकतो ?   
मायदेशात धर्म, वंश, जात, राष्ट्रीयत्व किंवा मतावरून धोका वाटत असल्यास कोणत्याही देशाच्या व्यक्तीला ब्रिटनमध्ये आश्रय मिळू शकतो. स्थलांतरित म्हणून तो ब्रिटनमध्ये पाच वर्षे राहू शकतो. पाच वर्षांत स्थिती सुधारली नाही तर ही मुदत वाढवली जाऊ शकते.   
 

कसे होता येऊ शकते स्थलांतरित ?   
ब्रिटनच्या स्थलांतरित विभागाकडे केवळ अर्ज करावा लागतो. सहा महिन्यांत त्यास मंजुरी मिळू शकते. कायदेशीर पेच निर्माण झाल्यास मंजुरीला एक वर्षही लागू शकते. आता जलदगती विभाग स्थापन करण्यात आला आहे. त्यात केवळ २२ दिवसांत ही प्रक्रिया सुरू होते. मार्चपर्यंत १४ हजारावर अर्ज.  

 

काय सरकार आर्थिक मदत करते ?   
ब्रिटन सरकार अशा स्थलांतरितास आर्थिक मदतही करते. त्याची राहण्याची व्यवस्था केली जाते. एकट्या व्यक्तीसाठी दर आठवड्याला  ३७ पौंड खर्च दिला जातो. सिंगल पॅरेंट्सला ७४ डॉलर व जोडप्याला १४७ पौंड दिले जातात. 

 
 दरवर्षी ब्रिटनमध्ये किती लोक येतात ?   
२०१८मध्ये मार्चपर्यंत ब्रिटनने १.३१ लाख लोकांचा व्हिसा मंजूर झाला आहे. त्यापैकी सर्वात जास्त भारतीय आहेत. त्यांची संख्या ४५.८९ हजारांवर आहे. रशियाचे २३.६ हजार व पाकिस्तानचे १५ हजार लोक सामील आहेत.   

 

 

 

बातम्या आणखी आहेत...