आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईचे जनजीवन टिपून करिअरची सुरुवात, भारताच्या 1st महिला फोटोग्राफर होमी व्यारावाला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशाच्या पहिला महिला फोटोग्राफर होमी व्यारावाला यांचा आज 104 वा जन्मदिन आहे. यानिमित्ताने सर्च इंजिन गुगलने त्यांचे डुडल तयार करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. होमी व्यारावाला यांचा जन्म गुजरातेत 9 डिसेंबर 1913 रोजी झाला होता.

> त्यांचे वडील एका थिएटर कंपनीचे मालक होते. त्यांच्यासोबत लहानपणी त्यांनी भरपूर प्रवास केला. यानंतर त्यांचे वडील मुंबईत स्थायिक झाले. येथे त्यांनी मुंबई विद्यापीठ आणि सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून शिक्षण घेतले.


फोटोग्राफीचा छंद
> मीडिया रिपोर्टसनुसार, त्यांच्या एका मित्राने त्यांना फोटोग्राफी शिकवली होती. फोटोग्राफी शिकल्यानंतर त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात मुंबईतील जनजीवन टिपणे सुरू केले. काही काळातच त्यांना नोकरी मिळाली.

> 1930च्या दशकात त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली होती. दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर त्यांनी मुंबईतील 'The Illustrated Weekly of India' नियतकालिकासाठी काम करणे सुरू केले. आपल्या करिअरच्या सुरुवातीला त्यांना कोणीही ओळखत नव्हते. त्यांचे फोटोज त्यांच्या पतीच्या नावाने प्रकाशित केले जात होते. त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाच्या एका फोटोग्राफर अन् अकाउंटंटशी लग्न केले होते. 

 

राष्ट्रीय स्तरावर मिळाली ओळख
> होमी व्यारावाला यांना राष्ट्रीय स्तरावर फोटोग्राफीसाठी ओळख मिळाली. 1942 मध्ये त्या आपल्या कुटुंबासह ब्रिटिश सूचना सेवेसाठी काम करण्यासाठी दिल्लीला आल्या. दिल्लीत त्यांनी हो ची मिन्ह, अमेरिकी राष्ट्राध्यक्ष आयसेनहॉवर आणि जॉन एफ. केनेडी यासारख्या नेत्यांसह फोटोसोबत मैमी आयसेनहॉवर आणि जॅकलिन केनेडी यांचेही सुंदर फोटो टिपले. त्यांनी महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांची भारत यात्रा आणि दलाई लामा तिबेटमधून निघतानाचे फोटो टिपण्याचीही संधी मिळाली.


>1970 मध्ये त्यांच्या पतीचे निधन झाले. यानंतर 1982 मध्ये त्या आपला मुलगा फारुकसह बडोद्यात स्थायिक झाल्या. 1989 मध्ये कॅन्सरचे निदान झाले. 15 जानेवारी 2012 रोजी त्यांचे निधन झाले आणि एका उमद्या महिला फोटो जर्नालिस्टनी जगाचा निरोप घेतला. त्यांनी काढलेली अप्रतिम छायाचित्रे आजही त्यांच्या स्मृती जागवतात.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, होमी व्यारावाला यांची काही छायाचित्रे

बातम्या आणखी आहेत...