आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पॅरिस - माध्यम स्वातंत्र्याच्या बाबतीत भारताची स्थिती मागील चार वर्षांच्या तुलनेत यंदा सर्वात वाईट स्तरावर पोहोचली आहे. जगभरातील १८० देशांतील माध्यम स्वातंत्र्य निर्देशांक नुकताच जाहीर झाला. यात भारत १३८ व्या क्रमांकावर आहे. याआधी २०१३ आणि २०१४ मध्ये भारताची रँकिंग १४० व्या क्रमांकावर होती. २०१७ मध्ये देश १३६ व्या क्रमांकावर पोहोचला होता. रँकिंगमध्ये पाकिस्तान भारतापेक्षा एका क्रमांकाने खाली म्हणजेच १३९ व्या क्रमांकावर आहे. २०१७ मध्ये पाकिस्तान याच क्रमांकावर होता.
निर्देशांकात नॉर्वेने सलग दुसऱ्या वर्षी पहिला क्रमांक पटकावला. याआधी २००७ ते २०१२ पर्यंत नॉर्वे देश अग्रस्थानी होता. आतापर्यंत १६ वेळा रँकिंग काढण्यात आली. यात ११ वेळा नॉर्वेने बाजी मारली आहे. रँकिंगमध्ये ब्रिटन ४० व्या तर अमेरिका ४५ व्या क्रमांकावर आहे. फ्रान्सच्या ‘रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स’ (आरडब्ल्यूबी) या स्वयंसेवी संस्थेने रँकिंगची घोषणा केली. २००२ पासून आरडब्ल्यूबीकडून माध्यम स्वातंत्र्याबाबत निर्देशांकाची घोषणा करण्यात येते.
अहवालात म्हटले आहे की, भारतात मागील काही दिवसांपासून राष्ट्रीय वादविवादांच्या मुद्द्यांना राष्ट्रविरोधी संबाेधले जात आहे. नरेंद्र मोदींचा हा राष्ट्रवाद धोका बनत चालला आहे. पत्रकार गौरी लंकेश आणि मार्च २०१८ मध्ये झालेल्या तीन पत्रकारांच्या हत्येचा उल्लेख अहवालात करण्यात आला आहे. जगातील माध्यमांची स्थिती कमकुवत होण्यामागे अमेरिका, रशिया आणि चीन या तीन सुपरपाॅवर कारणीभूत असल्याचे यात म्हटले आहे. अमेरिकन निवडणुकीत रशियाने दखल दिली आणि चीनमध्ये माध्यमांवर बंदी लादली गेल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे अहवालात सांगण्यात आले. चीनची माध्यमे कंट्रोल मॉडेलवर चालतात. जगातील मोठ्या देशांमध्ये जे राजकारणी जनतेतून निवडून येतात ते माध्यमांचा प्रभाव वाढू देऊ इच्छित नसल्याचे यात म्हटले गेले आहे.
पुढील स्लाइडवर वाचा, भारतापेक्षा खालच्या स्तरावर चीन...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.