आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकला अण्वस्त्र धमकीचे उत्तर द्यायला तयार, सरकार म्हटल्यास सीमपलिकडे कारवाई करू : रावत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिपिन रावत म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये असलेले सुरक्षा दल पाकिस्तानच्या शस्त्रसंत्री उल्लंघनाला जशास तसे प्रत्युत्तर देत आहे. (फाइल) - Divya Marathi
बिपिन रावत म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये असलेले सुरक्षा दल पाकिस्तानच्या शस्त्रसंत्री उल्लंघनाला जशास तसे प्रत्युत्तर देत आहे. (फाइल)

नवी दिल्ली - आर्मी चीफ बिपिन रावत म्हणाले की, भारतीय लष्कर पाकिस्तानच्या अण्वस्त्र धमकीला तोंड द्यायला पूर्णपणे तयार आहे. जर सराकारने परवानगी दिली तर बॉर्डरच्या पलिकडे कोणतेही ऑपरेशन राबवायला आम्ही तयार आहोत. 


कधीही पाकचा सामना करायची तयारी 
- न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार रावत शुक्रवारी म्हणाले की, आम्ही पाकिस्तानच्या खोटारडेपणाचे उत्तर देऊ. जर पाकिस्तानशी सामना झाला आणि आम्हाला काही कामगिरी देण्यात आली तर ती नक्की पूर्ण करू. 
- मी असे म्हणत नाही की, आम्ही केवळ एका कारणामुळे बॉर्डरपलिकडे जात नाही की, त्यांच्याकडे अण्वस्त्रे आहेत. आम्हाला त्यांच्या अण्वस्त्राच्या खोटारडेपणाला समोर आणायचे आहे. 
- भारत आणि अमेरिकेच्या लष्करातील संबंध वाढवणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा विचार करत असल्याचेही ते म्हणाले. 


पाकच्या लष्कराचा दहशतवाद्यांना मदत केल्याची किंमत समजावी 
- रावत म्हणाले, जम्मू-काश्मीरमध्ये सध्या सिक्युरिटी फोर्सेस पाकिस्तानला जशास तसे उत्तर देत आहेत. दहशतवादी गटांना मदत करण्याचे नुकसान काय असते हे पाकला समजावे हा आमचा उद्देश आहे. 
- पाकिस्तानातील दहशतनवाद हा कधीही न संपणारा आहे. भारतात दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी मदत करणाऱ्या पाकच्या तुकड्यांना आम्ही मदत करणार आहोत. पाकिस्तानी लष्करालाही वेदना कळायला हव्यात. 
- जर पाकिस्तान आर्मीला वेदना कळल्या नाही तर ते एकापाठोपाठ दहशतवादी पाठवतच राहतील. त्यामुळे आम्ही त्यांच्या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तुकड्यांना लक्ष्य करून कारवाई करणार आहोत. प्रत्युत्तरात कारवाई करताना पाकिस्तानात भारताच्या तुलनेत 3-4 पट अधिक मृत्यू झाल्याचे रावत म्हणाले. 
- 2016 मध्ये बुरहान वानी मारला गेल्यानंतर लष्कराने साऊथ काश्मीरमध्ये काऊंटर टेररिझम ऑपरेशनवर फोकस केले होते. पण आता याचे केंद्र उत्तर काश्मीर असेल. 

बातम्या आणखी आहेत...