आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायमूर्ती-सरन्यायाधीशांतील वाद मिटला, महाधिवक्ता के.के.वेणुगोपाल यांनी केला दावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सरन्यायाधीश आणि सुप्रीम कोर्टाचे चार वरिष्ठ न्यायधीश यांच्यातील वाद संपला असल्याचा दावा देशाच्या बार कौंसिलचे अध्यक्ष मनन मिश्रा यांनी म्हटले आहे. हा न्यायप्रक्रियेतील अंतर्गत वाद होता. त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न काही जणांनी केला मात्र ते यशस्वी झाले नाही, असेही मिश्रा यावेळी म्हणाले. 


जे चेलमेश्वर, रंजन गोगोई, माधव बी लोकूर आणि कुरीयन जोसेफ या चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन सुप्रीम कोर्टातील कारभार योग्य प्रकारे चालत नसल्याची तक्रार केली होती. सरन्यायाधीशांना पत्र लिहूनही काही फायदा झाला नाही असा आरोपही त्यांनी केला होता.  सरन्यायाधीशांना लिहिलेले पत्रही त्यांनी सार्वजनिक केले होते. 


बार कौंसिलने या प्रकरणात कोणत्याही प्रकारची मध्यस्थी केली नाही. हे प्रकरण न्यायमूर्तींनाच एकत्रित बसून सोडवायचे होते. त्याप्रकारे त्यांनी एकत्रितपणे चर्चा करून हे प्रकरण सोडवले आणि आता हे प्रकरण मिटले असल्याचे मिश्रा म्हणाले. 


पुढील स्लाइड्सवर वाचा, न्यायाधीशांनी सरन्यायाधीशांना लिहिलेल्या पत्रात काय होते...