आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनने डोकलाम परिसरात इमारत व बंकर बांधले-कांग्रेस; लष्करप्रमुख म्हणाले-तेथे सर्वकाही ठिक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नव्या सॅटेलाईट इमेजेसमध्ये डोकलाममध्ये चीनच्या सैनिकांची उपस्थिती स्पष्टपणे दिसत आहे. - फाइल - Divya Marathi
नव्या सॅटेलाईट इमेजेसमध्ये डोकलाममध्ये चीनच्या सैनिकांची उपस्थिती स्पष्टपणे दिसत आहे. - फाइल

नवी दिल्ली - सॅटेलाइट इमेजेसच्या हवाल्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या काही मीडिया रिपोर्टेसनुसार चीनने डोकलामच्या परिसरातील उत्तर भागात 7 हेलीपॅड तयार केले आहेत. त्याठिकाणी जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, टँक्स, आर्म्ड व्हेइकल्स, ऑर्टिलरीसह लष्कराचे साहित्य मोठ्या प्रमाणावर आढळून आले आहे. काँग्रेसने सरकारकडून या मुद्द्यावर उत्तर मागवले आहे. पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, चीनने डोकलाममध्ये दोन मजली इमारत तयार केली आहे. तर लष्करप्रमुख बिपीन शहा म्हणाले की, बुधवारी रायसीना डायलॉगमध्ये म्हटले की, दोन्ही देशांमध्ये डोकलामपूर्वी जसे नाते होते, तसेच झाले आहे. आता काहीही गंभीर समस्या नाही. त्याठिकाणी भारतीय लष्करही आहे. चिनी सैनिक परत आले तर आम्ही त्यांचा सामना करू. 


काँग्रेसचा आरोप.. 
सुरजेवाला म्हणाले, डोकलाम परिसरात चीनच्या कारवाया वाढल्या आहेत. सरकारने याबाबत स्पष्टीकरण द्यायला हवे. त्याठिकाणी चीनने दोन मजली इमारत आणि बंकर्स तयार केले आहेत. 


डोकलामनंतर दोन्ही देशांतील तणाव कमी 
लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी मात्र दोन्ही देशांमध्ये तणाव कमी करण्यासाठी अवलंबलेल्या पद्धतींबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, सीमेवर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये चर्चा होत आहे. आम्ही आपसांत बैठका सुरू केल्या आहेत. कमांडर्समध्येही चर्चा होत आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील नाते डोकलाम विवादापूर्वी जसे होते, तसेच बनले आहे. डोकलाममध्ये भारत-चीनच्या सेना 73 दिवस आमनेसामने होत्य. 28 ऑगस्ट 2017 ला हा वाद संपुष्टात आला होता. 


10 किलोमीटर परिसरात चीनची आर्मी तयार करतेय कॅम्प 
- मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे की, उत्तर डोकलाम परिसरात चीनने पुन्हा कॅम्प बनवायला सुरुवात केली आहे. त्यांचा उद्देश या भागात रस्ते तयार करण्याचा आहे. या भागापर्यंत लवकरच पोहोचता यावे म्हणून हा प्रयत्न सुरू आहे. 
- नवीन सॅटेलाइट इमेजेसवरून स्पष्टपणे दिसत आहे की, चीन कशाप्रकारे वादग्रस्त भागामधअये लष्करी छावणी उभारण्याचे काम करत आहे. भूतान ज्या भागावर दावा करतो, त्याच भागावर 10 चौरस किलोमीरटर परिसरात हे काम सुरू आहे. 

 

पुढे वाचा, काय आहे डोकलाम वाद...

बातम्या आणखी आहेत...