आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाजपेयी एम्समध्ये दाखल: प्रकृती स्थिर, मोदींकडून 55 मिनिटे विचारपूस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाजपेयींच्या जावयाशी चर्चा करताना मोदी. - Divya Marathi
वाजपेयींच्या जावयाशी चर्चा करताना मोदी.

नवी दिल्ली - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना सोमवारी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मूत्रमार्गात संसर्गामुळे यूरिन पास होण्यात अडचणी येत अाहेत. याआधी एम्स व भाजपने सांगितले की, ९३ वर्षीय वाजपेयींना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात आणले गेले. एम्सचे संचालक डाॅ. रणदीप गुलेरिया यांच्या नेतृत्वातील डॉक्टरांच्या टीमने त्यांची तपासणी केली. वाजपेयींची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना रात्रभर डॉक्टरांच्या देखरेखीखाली एम्समध्ये ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे. डॉक्टरांनुसार, वाजपेयींना एकच किडनी आहे. यामुळे त्यांचे डायलिसिस करता येत नाही.


संध्याकाळी अचानक वाजपेयींची विचारपूस करण्यासाठी एम्समध्ये नेत्यांची रीघ लागली. यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत अनेक अटकळी व्यक्त होऊ लागल्या. सर्वात आधी राहुल गांधी दाखल झाले. त्यानंतर नरेंद्र मोदी, अमित शहा, राजनाथ सिंह, जे.पी. नड्डा, लालकृष्ण अडवाणी आदींनीही धाव घेतली. मोदींनी एम्समध्ये ५५ मिनिटे थांबून वाजपेयींचे कुटुंबीय व डॉक्टरांकडून प्रकृतीची माहिती घेतली. ते वाजपेयींना पाहण्यासाठी थेट आयसीयूमध्ये गेले. तेथे २० मिनिटे थांबले. मोदींशिवाय एकही नेता आयसीयूत गेला नाही. वाजपेयींचे जावई (मानसकन्येचे पती) रंजन भट्टाचार्य व खासगी सचिव एम.सी. जिग्सा सकाळपासून वाजपेयींसोबत आहेत. या दोघांशिवाय इतर कुणालाही वाजपेयींजवळ जाण्याची परवानगी नाही.

 

कार्डिओ अँड न्यूरो विभागात उपचार
एम्स रुग्णालयाच्या सूत्रांनुसार, माजी पंतप्रधान वाजपेयींवर कार्डिओ अँड न्यूरो टाॅवर विभागात उपचार सुरू आहेत. एम्सचे संचालक डॉ. गुलेरिया, एक पोटविकारतज्ज्ञ व एका नेफ्रॉलॉजिस्ट स्पेशालिस्टसह इतर डॉक्टरांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केली. सूत्रांनुसार त्यांना आयसीयूमध्ये ठेवलेले आहे.

 

१० महिन्यांनंतर पुन्हा एम्समध्ये
वाजपेयींना यापूर्वी ऑगस्ट २०१७ मध्ये एम्समध्ये आणले होते. त्या वेळी त्यांना भोवळ येण्याचा त्रास होत होता. तथापि, त्यांना लगेचच डिस्चार्ज देण्यात आला होता. वाजपेयींच्या घरीही त्यांच्या उपचारांची पूर्ण व्यवस्था आहे.

बातम्या आणखी आहेत...