आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FLASH BACK: अशा होत्या जया अम्मा, 68 वर्षांच्या आयुष्याचा थक्क करणारा प्रवास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आज जयललिता यांचा जन्मदिन आहे. त्यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1948 रोजी मंडिया, म्हैसूर (आता कर्नाटक) मध्ये झाला. चित्रपटांत आपल्या अभिनयाने सर्वांच्या हृदयात स्थान मिळवणाऱ्या जयललिता यांना "अम्मा" या नावानेच संबोधित केले जायचे. त्या तमिळनाडूच्या 3 वेळा मुख्यमंत्री राहिल्या. त्यांनी ऑल इंडिया अण्ण द्रविड मुनेत्र कळघम पक्षातून निवडणुका लढल्या आणि जिंकल्याही. जयललिता यांच्या आईही तामिळ चित्रपटांत काम करायची. 2 वर्षे वयातच त्यांचे वडील जयराम आईला सोडून गेले होते. जयललिता यांचे प्राथमिक शिक्षण बंगळुरू आणि चेन्नईत झाले. DivyaMarathi.Com यानिमित्ताने त्यांच्या आयुष्याशी निगडित काही फॅक्ट्स आपल्या वाचकांना सांगत आहे.

 

> तामिळनाडूच्या अम्मा म्हणजेच जडललिता यांच्या संपूर्ण आयुष्याचा प्रवासच थक्क करून सोडणारा आहे. वयाच्या दुसऱ्या वर्षी वडील गमावल्यापासून ते अगदी मुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारेपर्यंत त्यांनी जीवनात अनेक चढउतारांचा सामना केला. त्यांच्या जीवनात अनेक नाट्यमय घटनाही घडल्या. पण सर्व परिस्थितीवर मात करत त्या अवघ्या जनतेच्या अम्मा बनल्या.

> सिनेसृष्टीतील शिखरापर्यंत पोहोचणे आणि त्यानंतर राजकारणातही शिखर गाठणे असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांच्या जीवनात एक काळ असाही होता की, त्या आत्महत्या करण्याच्या विचारात होत्या. त्यांच्या जीवनाची ही सर्व कथा आपण आज जाणून घेणार आहोत.

 

पुढील स्लाईड्सवर वाचा, जयललितांच्या आयुष्यात केव्हा काय-काय घडले...

बातम्या आणखी आहेत...