आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रद्युम्न मर्डर केस : 11वीच्या आरोपी विद्यार्थ्याला जामीन नाकारला, कोर्टाने फेटाळली याचिका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 गुडगाव - प्रद्युम्न हत्याकांड प्रकरणात सोमवारी कोर्टाने 11वीच्या आरोपी विद्यार्थ्याची जामीनाची याचिका फेटाळली. त्यापूर्वी शनिवारी कोर्टात आरोपीच्या जामीनावर युक्तीवाद झाला होता. त्यानंतर कोर्टाने निर्णय राखून ठेवला होता. प्रद्युम्नचे वडील वरुण ठाकूर यांच्यावतीने वकील सुशील टेकरीवाल यांनी विद्यार्थ्याच्या जामीनाचा विरोध केला होता. 
 
सज्ञान म्हणून आरोपी विद्यार्थ्यावर चालवला जातोय खटला 
- जुवेनाइल जस्टीस बोर्डाने आरोपी असलेल्या 11वीच्या विद्यार्थ्यावर सज्ञान समजून खटला चालवण्याचा निर्णय दिला होता. या निर्णयामागे आरोपी विद्यार्थ्याच्या संदर्भातीलल सामाजिक आणि मानसिक अहवाल महत्त्वाचा ठरला होता. विद्यार्थी अत्यंत आक्रमक असल्याचे सामाजिक रिपोर्टमध्ये समोर आले होते. 
- तर मानसिक रिपोर्टबाबत डॉक्टरांनी विद्यार्थ्यांशी बोलून माहिती दिली होती. वेगवेगळ्या परिस्थितीत तो कसा वर्तन करतो, हे डॉक्टरांनी सांगितले होते.
 
असे आहे प्रकरण.. 
- गुडगावच्या रेयान इंटरनॅशनल स्कूलमध्ये 8 सप्टेंबरला 7 वर्षांच्या प्रद्युम्न ठाकूरची हत्या झाली होती. त्याचा मृतदेह टॉयलेटमध्ये आढळला होता. या प्रकरणात पोलिसांनी स्कूल बस कंडक्टर अशोक कुमारला अटक केली होती. 
- चौकशी सीबीआयला सोपवण्यात आली. सीबीआयने कंडक्टर अशोक नव्हे तर 11वीचा विद्यार्थी आरोपी असल्याचे सांगत नवे वळण दिले आणि त्याला अटक केली. 
- जुवेनाइल कोर्टात झालेल्या सुनावणीत विद्यार्थ्यावर सज्ञान समजून खटला चालवण्याचे आदेश देण्यात आले. 
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, आरोपी कसा अडकला जाळ्यात आणि सीबीआयच्या थेअरीवर निर्माण झालेले प्रश्नचिन्ह...
बातम्या आणखी आहेत...