आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Read Personal Life Facts About Indian Presidents Pranab Mukherjee To Rajendra Prasad

असे प्रेम व्यक्त करायचे प्रणब, पत्नीने इंटरव्ह्यूमध्ये सांगितल्या या पर्सनल गोष्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशाचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी 11 डिसेंबर रोजी 82 वर्षांचे झाले आहेत. प. बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील मिराती गावात जन्मलेले प्रणब यांनी या वर्षी जुलैमध्ये राष्ट्रपतिपदाचा कार्यकाळ पूर्ण केला. त्यांच्या वाढदिवसावर DivyaMarathi.Com आपल्या वाचकांना भारताच्या तमाम प्रेसिडेंट्सच्या पर्सनल लाइफशी निगडित फॅक्ट्स सांगत आहे.

 

पत्नीसह रोज ही परंपरा निभवत होते प्रणब
- देशाचे 13वे राष्ट्रपती राहिलेले प्रणब मुखर्जी यांच्या पत्नी सुव्रा यांचे 2015 मध्ये देहावसान झाले.
- सुव्रा मुखर्जी यांनी 2012 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत खासगी आयुष्याशी निगडित अनेक बाबी शेअर केल्या होत्या. त्या म्हणाल्या होत्या, "प्रणब जास्त करून प्रेम व्यक्त करत नाहीत. आम्ही मूकपणेच एकमेकांचे बोलणे समजून घेतो. त्यांची एक सवय आहे. ते रोज सकाळी अंघोळीनंतर माझ्या डोक्यावर हात ठेवतात आणि काही मंत्र पुटपुटतात. बहुधा, ही त्यांची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत आहे. 55 वर्षांच्या वैवाहिक आयुष्यात आमची कधीही भांडणे झाली नाहीत."
- सुव्रा मुखर्जी मूलत: बांगलादेशच्या रहिवासी होत्या. त्या जेव्हा 10 वर्षांच्या होत्या, तेव्हा त्यांचे कुटुंब स्थलांतरित होऊन कोलकात्यात आले होते.


पत्नीवर लिहिलेले आहे पुस्तक
- लेखिका संगीता घोष यांनी प्रणब मुखर्जी यांच्या पत्नीवर एक पुस्तक लिहिले आहे, जे याच वर्षी जुलैमध्ये प्रकाशित झाले.
- 'प्रणब प्रेयसी' नावाच्या या पुस्तकात सुव्रा आणि प्रणब मुखर्जी यांच्याशी निगडित किस्से आणि फॅक्ट्स आहेत.

 

पुढच्या स्लाइडवर वाचा, भारतीय राष्ट्रपतींच्या पर्सनल लाइफशी निगडित फॅक्ट्स...

बातम्या आणखी आहेत...