आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अयोध्या प्रकरणी पुढील सुनावणी 14 मार्चला, अयोध्या हा जमिनीचा वाद : सरन्यायाधीश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- दस्तएेवजांचा अनुवाद झालेला नसल्याने गुरुवारी तिसऱ्यांदा सुप्रीम कोर्टात अयोध्या वादाची सुनावणी लांबणीवर टाकावी लागली. कोर्टाने वाल्मीकी रामायण, रामचरितमानस व गीतेसह २० धार्मिक पुस्तकांतून घेतलेल्या तथ्यांचा इंग्रजीत अनुवाद करण्याचे आदेश दिले आहेत. 


उत्तर प्रदेश सरकारने सर्व पक्षकारांना दोन आठवड्यांत अनुवाद उपलब्ध करून द्यावा लागेल. पुढील सुनावणी १४ मार्चला होईल. अयोध्या वादाकडे धार्मिक दृष्टिकोनाच्या नव्हे, तर फक्त जमिनीचा वाद म्हणून पाहिला जाईल, असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे. तीन न्यायमूर्तींच्या विशेष न्यायपीठासमोर सुनावणी सुरू होताच याचिकाकर्त्यांच्या एका वकिलाने म्हटले की, अयोध्या वाद लोकांच्या भावनेशी जुळलेला आहे. सरन्यायाधीश म्हणाले, मला असे युक्तिवाद पटत नाहीत. हा निव्वळ जमिनीचा वाद आहे. तुम्ही फक्त तार्किक युुक्तिवाद मांडा.

 

यांच्यासमक्ष सुनावणी
दीपक मिश्रा, अब्दुल नजीर व अशोक भूषण यांनी सुनावणी केली. यूपीकडून अति. सॉलि.जनरल तुषार मेहता, बाबरी पक्षकारांकडून राजीव धवन व मकबूल यांनी बाजू मांडली.

 

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा... अयोध्या प्रकरणातील तीन पक्षकार

बातम्या आणखी आहेत...