आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीतील \'बॉस\'च्या इशाऱ्यावर CBI ने लावला नाटक केल्याचा आरोप, तोगडियांचा पलटवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सीसीटीव्ही फुटेजमध्ये तोगडिया नॉर्मल दिसत आहेत. - Divya Marathi
सीसीटीव्ही फुटेजमध्ये तोगडिया नॉर्मल दिसत आहेत.

अहमदाबाद - प्रवीण तोगडिया विहिंपच्या पालडी कार्यालयातून बेपत्ता झाल्याची अफवा पसरवण्यात आली होती. त्यानंरच्या नाट्यमय घडामोडींमध्ये रात्री चंद्रमणी हॉस्पिटलमध्ये ते अत्यवस्थ अवस्थेत असल्याचे दाखवण्यात आले. त्याच्या बेपत्ता होण्याबाबत क्राइम ब्रँचला विहिंपचे ज्येष्ठ वकील आणि कार्यकर्ता यांनी अर्ज केला होता. तोगडियांनी त्यांच्याविरोधात षडयंत्र रचले जात असल्याचे म्हटले होते. त्यावर क्राइम ब्रँचने तपास करत याच्या मुळाशी जाऊन हे संपूर्ण केवळ नाटक होते असा दावा केला आहे. तर तोगडियांनी मात्र या प्रकरणी पुन्हा भाजपवर आरोप केले आहेत. सीबीआय दिल्लीतील बॉसच्या इशाऱ्यावर हे आरोप करत असल्याचे तोगडिया म्हणाले आहेत. 

 

पायी चालताना नॉर्मल दिसत आहेत तोगडिया…
क्राइम ब्रँचने या प्रकरणाची सखोल चौकशी केली. त्यात समोर आले की, तोगडिया यांनी स्वतःच बेपत्ता झाल्याचे नाटक केले होते. ते त्यांचा कार्यकर्ता धनश्यामबरोबर त्यांचेच घर असलेल्या 23 संगीन बंग्लोज थलतेज येथे गेले होते. या प्रकरणी संगीन बंग्लोजच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते स्पष्ट दिसत आहेत. त्याशिवाय 108 च्या अधिकृत रिपोर्टमध्येही ते पूर्णपणे नॉर्मल असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावरून क्राइम ब्रँचने हा निष्कर्ष काढला आहे की तोगडिया यांनी स्वतःच बेपत्ता झाल्याची अफवा पसरवली होती. 

 

दवाखान्यात घेतली पत्रकार परिषद 

विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया (६२) यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाले, ‘जुने खटले उकरून मला अडकवले जात आहे. सोमवारी राजस्थान पोलिसांचे पथक आले होते. माझ्या एन्काउंटरची शक्यता होती. मी घाबरत नाहीये, मात्र मला घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे.’ ताेगडिया सोमवारी सकाळी अचानक बेपत्ता झाले होते. तब्बल १२ तासांनी ते बेशुद्धावस्थेत सापडले होते. पत्रकार परिषदेत म्हणाले, ‘काही काळापासून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. पत्रकार परिषदेनंतर पाटीदार नेता हार्दिक पटेल व काँग्रेस नेते अर्जुन मोढवाडिया यांनीही तोगडियांची भेट घेतली.

 

 

राजस्थानातील पोलिस त्यांना ज्या प्रकरणामध्ये अटक करण्यासाठी आजामीनपात्र वॉरंट घेऊन आले होते. ते नेमके प्रकरण काय होते ते जाणून घ्या पुढील स्लाइड्सवर...अखेरच्या स्लाइडवर 108 चा रिपोर्ट..


 

बातम्या आणखी आहेत...