आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरोगेसीच्या माध्यमातून आई बनणार्‍या महिलांना मिळेल 26 आठवड्यांची मॅटरनिटी लीव्ह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सरोगेसीच्या माध्यमातून आई बनणार्‍या केंद्र सरकारी महिला कर्मचार्‍यांनाही आता 26 आठवड्यांची मॅटरनिटी लीव्ह मिळणार आहे. याबाबत केंद्र सरकारने सर्व मंत्रालये तसेच विभागात अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेत याप्रकरणी दिल्ली हायकोर्टाने 2015 मध्ये दिलेल्या निर्णयाचाही उल्लेख करण्यात आला आहे.

 

मार्च 2017 मध्ये मॅटरनिटी लीव्हवर सुधारित विधेयकाला लोकसभेत मंजुरी मिळाली होती. यात गरोदर महिला कर्मचारीला 26 आठवड्यांची मॅटरनिटी लीव्ह देण्याची तरतूद करण्यात आली होती. यापूर्वी महिला कर्मचार्‍यांना केवळ 12 आठवड्यांची मॅटरनिटी लीव्ह मिळत होती.

बातम्या आणखी आहेत...