आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISIS च्या कब्जातुन इराक मुक्त; सीरियालगतच्या सीमेवर सैन्याचा कब्जा; पीएम हैदर अल-अबादी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इराकचे पंतप्रधान हैदर अल-अबादी यांनी ISIS चा खात्मा केल्याची घोषणा केली. - Divya Marathi
इराकचे पंतप्रधान हैदर अल-अबादी यांनी ISIS चा खात्मा केल्याची घोषणा केली.

नवी दिल्ली/बगदाद- सीरियाच्या सीमेजवळ असलेल्या वाळवंटाच्या भागात धडक कारवाई करत अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर इराकने 'आयसिसविरुद्ध'चा लढा यशस्वीपणे संपल्याचे जाहीर केले. 'आयसिस'विरुद्धच्या लढाईत इराकी सैन्याला अमेरिकी सैन्याची साथ मिळाली. इराकचे पंतप्रधान हैदर अल-अबादी बगदादमध्ये पत्रकार परिषद घेऊन 'आयसिस'विरोधातील सैन्याची कारवाई संपल्याचे जाहीर केले. 

 

जिद्दीमुळे मिळाला विजय

 बगदादमध्ये एका पत्रकार परिषद हैदर अल-अबादी म्हणाले की, आमच्या सैन्याने इराक-सीरिया सीमेला आपल्या नियंत्रणाखाली घेतले आहे. ISIS विरोधातील युध्द संपल्यात जमा आहे. 

- शत्रु इराकी सभ्यता संपवण्याची मनिषा बाळगून होता पण आम्ही आमच्या इराद्याने आणि एकतेने त्याच्यावर कमी वेळेत विजय मिळवला आहे.

 

पुढील स्लाईडवर फोटो आणि माहिती

 

 

बातम्या आणखी आहेत...