आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्रकार बुखारींच्या हत्येमागे आयएसआयचा हात; केंद्रीय मंत्री आर.के. सिंह यांचा दावा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमध्ये ज्येष्ठ पत्रकार शुजात बुखारी यांच्या हत्येमागे पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआयचा हात अाहे. काश्मीर खोऱ्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्याची ही पहिलीच वेळ नाही, असे केंद्रीय मंत्री आर.के. सिंह यांनी स्पष्ट केले आहे. ते शुक्रवारी एका टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.


बुखारींची हत्या हे दहशतवादी कृत्य आहे. त्याचा कट पाकिस्तानात शिजला होता. तो आयएसआयने केला. ही घटना अत्यंत निंदनीय आहे. हा हल्ला पाकिस्तानातील म्होरक्याच्या आदेशावरून झाला, असा दावा सिंह यांनी केला.अंत्यसंस्कारासाठी गर्दी : बुखारी यांच्यावर बारामुल्लातील खिरी गावामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी गर्दी झाली होती. मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांचीही उपस्थिती होती. 

 

काश्मीर धोरणावर फेरविचार करावा : मायावती
सीमेवरील राज्यांत जवान सातत्याने शहिद होत आहेत. त्यातच काश्मीरात संपादक शुजात बुखारी यांची हत्या झाली आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी आता काश्मीर धोरणावर फेरविचार करावा. त्याची वेळ आली आहे. देशहितासाठी फेरविचार करावा, अशी मागणी बसपाच्या प्रमुख मायावती यांनी केली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...