आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिमाचलच्या मुख्यमंत्रिपदी ठाकूर यांच्‍या सोबत 11 मंत्र्यांचा शपथविधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिमला- भाजपचे नेते जयराम ठाकूर यांनी एेतिहासिक रिज मैदानात झालेल्या सोहळ्यात बुधवारी सकाळी ११.२८ वाजता हिमाचल प्रदेशचे १४ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ठाकूर यांच्यासमवेत त्यांच्या मंत्रिमंडळातील ११ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.  


मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या मंत्रिमंडळात मंडी लोकसभा मतदारसंघातील  फक्त तीन जिल्ह्यांना प्रतिनिधीत्व मिळाले आहे. यामध्ये मंडी येथून अनिल शर्मा, लाहोलचे डॉ. रामलाल मारकंडा आणि कुल्लूचे गोविंदसिंह ठाकूर यांना मंत्रिपद देण्यात आले आहे. कांगडा हमीरपूर भागात तीन-तीन मंत्रिपदे देण्यात आली आहेत, तर सिमला येथून अाठ जागांवर भाजपला विजय मिळालेला असला तरी केवळ दोन मंत्रिपदे त्यांच्या वाट्याला आली.

  
जिल्हावार स्थिती अशी, कांगडा-४, मंडी-२, सिमला, सोलन, उना, कुल्लू व लाहौल स्पीतिला एक-एक मंत्रिपद वाट्याला आले. किन्नोर, सिरमौर, चम्बा, हमीरपूर आणि बिलासपूर येथील कोणत्याही भाजप आमदारास मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही. शपथविधीस हिमाचल प्रदेशातील अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

 

धूमल यांच्या सांगण्यावरून किशन कपूर यांची निवड  
कांगडा येथील दिग्गज नेते किशन कपूर यांचे नाव मंत्र्यांच्या यादीत नव्हते. ऐनवेळी माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली. किशन कपूर  माजी मुख्यमंत्री शांताकुमार यांच्या जवळचे मानले जातात. सहा दिग्गज नेत्यांचा समावेश मंत्रिमंडळात करण्यात आलेला नाही. यात माजी मंत्री नरेंद्र बरागटा, रमेश धवाला आणि दुसऱ्यांदा हमीरपूर येथून निवडून आलेले नरेंद्र ठाकूर, चंबाचे विक्रम जरयाल व हंसराज यांचा समावेश आहे. राजीव बिंदल यांचेही नाव यादीत नव्हते. परंतु त्यांना विधानसभा सभापतिपद मिळण्याची शक्यता आहे.

 

यांनी घेतली शपथ
जयराम ठाकूर - मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मंडी जिल्ह्यातील राहणारे. राजपूत समाजाचे नेते. पाचव्यांदा आमदार बनले आहेत. 1998 मध्ये सर्वप्रथम निवडून आले होते. आरएसएस आणि अभाविपशी संलग्न राहिलेले आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्षही होते. 
महेंद्र सिंह ठाकूर - कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. मंडीच्या धर्मपूरमधून सलग सातव्यांदा विजयी. दोन वेळा हिमाचल सरकारमध्ये मंत्री राहिलेले आहेत. 

किशन कपूर - कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. धर्मशालाचे आमदार आहेत. आधी देन वेळा मंत्री बनले आहेत. पाचव्यांदा आमदार बनले आहेत. 

सुरेश भारद्वाज - शिमलामधून आमदार असून चौथ्यावेळी विजयी झाले आहेत. संस्कृतमध्ये घेतली शपथ. भाजपचे बडे ब्राह्मण नेते. लॉ ग्रॅज्युएट आहेत. 
अनिल शर्मा - चौथ्यावेळी आमदार बनलेले वीरभद्र सरकारमध्ये मंत्री होते. कांग्रेसमधून भाजपमध्ये आले आहेत. राज्यसभेचे खासदार राहिलेले आहेत. काँग्रेसचे नेचे सुखराम यांचे पुत्र आहेत. सलमानची बहीण अर्पिताचे वडील. 
सरवीन चौधरी - चौथ्यावेळी आमदार बनल्या असून आधीही मंत्री होत्या. कांगडा जिल्ह्याच्या शाहपूरमधून आमदार. 
रामलाल मार्कंडा - आधीही मंत्री होते. आदिवासी समाजातील नेते. लाहौल स्पितीमधून तिसऱ्यांदा आमदार बनले आहेत. 
विपिन सिंह परमार - कांगडाच्या सुहलचे आमदार असून तिसऱ्यांदा विजयी झाले आहे. संघ आणि अभाविपशी संबंधित. 
वीरेंद्र कंवर - ऊना जिल्ह्यातील कुटलैहड मतदारसंघातून आमदार बनले. चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. संघ आणि अभाविपचे सक्रिय सदस्य. 
विक्रम सिंह - हिमाचलमधील राजपूत समाजाचे मोठे नेते.कांगडा जसवा-प्रागपूरमधून विजयी. भाजपच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष होते. तिसऱ्यांदा आमदार बनले. 
गोविंद सिंह ठाकूर - संस्कृतमध्ये शपथ घेणारे दुसरे मंत्री. मनालीचे आमदार असून तिसऱ्यांदा येथून विजयी झाले आहेत. पहिल्यांदा मंत्री बनले. यांचे वडीलही मंत्री होते. 
डॉक्टर राजीव सैजल - तिसऱ्यांदा आमदार बनलेले राजीव सैजल डॉक्टर आहेत. भाजपचे दलित नेते असून सोलन जिल्ह्यातील कसौली मतदारसंघातून विजयी झाले आहेत. 

 

हिमाचलचे 13वे मुख्यमंत्री 
- जयराम ठाकूर हिमाचल प्रदेशचे 13वे मुख्यमंत्री आहेत. भाजपने विधानसभा निवडणुकीत प्रेमकुमार धूमल यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार बनवले होते. पण त्यांचा निवडणुकीत पराभव झाला. 
- शिमलामध्ये यापूर्वी कधीही कोणत्याही शपथविधी सोहळ्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली नव्हती. पंतप्रधान आणि इतर राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्र्यांना आणण्यासाठी 325 गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. 
- सोहळ्याच्या ठिकाणी पोहचण्यासाठी सचिवालयाच्या 252 आणि इतर बोर्ड कॉर्पोरेशन्सच्या 73 गाड्या बोलावण्यात आल्या. मोदी आणि अमित शहांसह इतर 14 जणांचे हेलिकॉप्टर अनाडेलमध्ये उतरले तर 3 चार्टर्ड प्लेन जुब्बडहट्टी एअरपोर्टवर उतरले. 

 

पुढे पाहा संबंधित PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...