Home | National | Delhi | Jammu Kashmir Sunjwan Army Camp Srinagar Crpf Camp Terrorists Attack Operation

सीअारपीएफच्या कॅम्पवर अतिरेकी हल्ला, 1 जवान शहीद; 48 तासांतच दुसरा हल्ला

दिव्य मराठी वेब टीम | Update - Feb 13, 2018, 02:44 AM IST

जम्मूतील सुजवा कॅम्पवरील अतिरेकी हल्ल्याला ४८ तास उलटत नाहीत ताेच श्रीनगरमधील सीअारपीएफ कॅम्पवर साेमवारी दहशतवादी

 • Jammu Kashmir Sunjwan Army Camp Srinagar Crpf Camp Terrorists Attack Operation

  जम्मू/ श्रीनगर- जम्मूतील सुजवा कॅम्पवरील अतिरेकी हल्ल्याला ४८ तास उलटत नाहीत ताेच श्रीनगरमधील सीअारपीएफ कॅम्पवर साेमवारी दहशतवादी हल्ला झाला. पहाटे साडेचार वाजता एका पहारेकऱ्याच्या सतर्कतेमुळे हे अतिरेकी कॅम्पमध्ये घुसू शकले नाहीत. जवानांनी प्रत्त्युत्तर दिल्यानंतर तेथून फरार झालेल्या अतिरेक्यांनी श्रीनगरमधील करणनगर भागातील एका रिकाम्या घराचा अाश्रय घेऊन तेथून जवानांवर गाेळीबार सुरू केला. या चकमकीत सीअारपीएफच्या ४९ व्या बटालियनचे काॅन्स्टेबल सुजाहिद खान शहिद झाले. रात्री उशिरापर्यंत ही चकमक थांबून थांबून सुरू हाेती. जवानांनी या संपूर्ण भागाला वेढा टाकला अाहे. मात्र संबंधित घरात नेमके किती अतिरेकी लपले अाहेत याची माहिती अजून मिळाली नव्हती. दुसरीकडे, स्थानिक युवकही जवानांवर दगडफेक करत अाहेत.


  पाकशी चर्चा हाच पर्याय : मुफ्ती
  जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या, ‘हा हिंसाचार राेखण्यासाठी अापण पाकिस्तानशी चर्चा केली पाहिजे. मात्र असा पर्याय कुणी मांडला तर मीडिया त्याला देशद्राेही ठरवून माेकळी हाेते. मात्र या मुद्द्यावर ताेडगा काढण्यासाठी चर्चेशिवाय कुठलाही दुसरा मार्ग नाही.’

  संरक्षणमंत्री म्हणाल्या : चाेख प्रत्युत्तर देऊ

  - संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या, ‘सुजवा कॅम्प हल्ला जैश-ए- माेहंमदने केला. त्याचा कट पाकिस्तानात रचला हाेता. भारताकडून त्याला चाेख प्रत्युत्तर दिले जाईल.
  - या हल्ल्याचे पुरावे अाम्ही पाकिस्तानला सुपूर्द करू. या हल्ल्यात चार अतिरेकी असल्याचा संशय अाहे, पैकी तीन मारले गेले. एक जणाचा शाेध सुरू अाहे. कदाचित ताे स्थानिक असावा.

  जवानाने पहिल्या संशयित हलचाली
  - सीआरपीएफच्या प्रवक्तांनी सांगितले, 'कॅम्पमध्ये सोमवारी पहाटे 4.30 वाजता संशयित हलचाली होत असल्याचे एका जवानाच्या लक्षात आले. त्याने तत्काळ हलचालीच्या दिशेन फायरिंग केली.'
  - दहशतवाद्यांनी तत्काळ तेथून पळ काढला आणि बांधकाम सुरु असलेल्या एका इमारतीचा आसरा घेतला. सीआरपीएफने सध्या बिल्डिंगला वेढा टाकला आहे.
  - सीआरपीएफ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की बिल्डिंगमध्ये 2 दहशतवादी असण्याची शक्यता आहे. दहशतवाद्यांकडून होत असलेली फायरिंग पाहून आणखी जवान पाठवण्यात आले आहे. जेणे करुन दहशतवादी पळून जाणार नाही.


  सुंजवां कँपमध्ये पोहोचली एनआयए टीम, लष्कराने दिले पुरावे
  - हल्ल्याच्या चौकशीसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेची (एनआयए) 5 जणांची टीम जम्मूमध्ये पोहोचली आङे. लष्कराला मिळालेले दहशतवाद्यांचे पुरावे ते तपासणार आहेत.
  - आर्मी चीफ जनरल बिपिन रावत यांनी जम्मू येथे पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. राज्यपाल एन.एन. व्होरा यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली.

  आतापर्यंत 5 जवान शहीद
  - आर्मी कँपमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात क्वॉर्टरमध्ये एक सुभेदार, दोन जवान आणि एका वृद्धाचा मृत्यूदेह सापडला. आतापर्यंत दोन सुभेदारांसह पाच जवान शहीद झाले आहे. एका जवानाच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे.
  - 6 जवानांसह 12 जण जखमी आहेत. यामध्ये लेफ्टनंट कर्नल रोहित सोळंकी आणि मेजर अविजिट सिंह यांच्यासह 6 जवान आणि 6 महिला व लहान मुले आहेत.
  - शनिवारी आर्मी कँपमध्ये दहशतवाद्यांनी सैन्याच्या जवानांच्या गणवेशात घुसखोरी केली होती. त्याच्याजवळ एके-56 रायफल, अंडर बॅरल ग्रेनेड लॉन्चर आणि मोठ्या प्रमाणात दारुगोळा होता.
  - शनिवारी रात्री फायरिंग बंद झाली होती. मात्र दहशतवादी अजूनही लपून बसले असतील या शक्यतेने लष्कराने सर्च ऑपरेशन सुरु ठेवले.

  संघ तीन दिवसांत जवान तयार करु शकतो - मोहन भागवत
  दुसरीकडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी म्हटले आहे की लष्कराला एक जवान तयार करण्यासाठी 6ते7 महिने लागतात. संघ अवघ्या तीन दिवसांमध्ये सैनिक तयार करु शकते. एवढी आमची क्षमता आहे.
  - 'देशाला गरज पडली आणि युद्धाची स्थिती निर्माण झाली व संविधानाने परवानगी दिली तर स्वंयसेवक या मोर्चावरही लढण्यास तयार आहे,' असेही मोहन भागवत म्हणाले.

  पाच शहीदांमध्ये दोन सुभेदार, 1 हवालदार
  - सूभेदार मदन लाल चौधरी
  - सुभेदार मोहम्मद अशरफ मीर
  - हवलदार हबीबुल्लाह कुरैशी
  - नायक मंजूर अहमद
  - लांस नायक मोहम्मद इकबाल
  - लांस नायक मो. इकबाल यांचे वडील (सिव्हिलियन)

  पुढील स्लाइडमध्ये, गोळीबारात जखमी महिलेने दिला मुलीला जन्म

 • Jammu Kashmir Sunjwan Army Camp Srinagar Crpf Camp Terrorists Attack Operation
  सुंजवां आर्मी कँपमध्ये जवळपास 700 लोक राहातात.
 • Jammu Kashmir Sunjwan Army Camp Srinagar Crpf Camp Terrorists Attack Operation
  रायफलमॅन नजीर अहमद यांची पत्नी शहजादा खान यांनी गोंडस मुलीला जन्म दिला.

  गोळीबारात जखमी महिलेने दिला मुलीला जन्म

   

  सुंजवां येथे दहशतवादी हल्ल्यादरम्यान एक अानंददायी घटना घडली अाहे. गाेळीबारात जखमी झालेल्या गर्भवती महिलेने रात्रभर मृत्यूशी दाेन हात करत एका मुलीला जन्म दिला. शनिवारी गाेळीबाराचा अावाज एेकून रायफलमॅन नजीर अहमद यांची पत्नी शहजादा खान या घराबाहेर पडल्या हाेत्या; परंतु त्याच वेळी त्यांच्या कंबरेखालील भागाला एक गाेळी लागली. त्यांच्या विव्हळण्याचा अावाज एेकून शेजाऱ्यांनी तत्काळ धाव घेत त्यांना घरात अाेढले. त्यानंतर गर्भवती महिला जखमी झाल्याची सूचना मिळताच एक वाहन पाठवून शहजादा यांना रुग्णालयात हलवण्यात अाले.

 • Jammu Kashmir Sunjwan Army Camp Srinagar Crpf Camp Terrorists Attack Operation
  सुंजवां आर्मी कँपवर शनिवारी पहाटे हल्ला झाला होता. त्यानंतर येथे टँक पाठवण्यात आला.
 • Jammu Kashmir Sunjwan Army Camp Srinagar Crpf Camp Terrorists Attack Operation
  आर्मी कँपवर हल्ला करणाऱ्या जैश-ए-मोहम्मदच्या 4 दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले.
 • Jammu Kashmir Sunjwan Army Camp Srinagar Crpf Camp Terrorists Attack Operation
  52 तासानंतरही येथे ऑपरेशन सुरु आहे.

Trending