आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांचा मृत्यू 5 नाही तर 4 डिसेंबर 2016 रोजी झाला होता. अम्मा या नावाने प्रसिद्ध तत्कालीन मुख्यमंत्री या जगात नाहीत याची अधिकृत घोषणा मृत्यूच्या एका दिवसानंतर करण्यात आली. हे म्हणणे आहे त्यांच्या जवळचे राहिलेले व्हीके शशिकला यांचे भाऊ दिवाकरण यांचे. जयललिता देशाच्या सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय राजकारण्यांपैकी एक होत्या. DivyaMarathi.Com यानिमित्ताने त्यांच्या आयुष्याशी निगडित काही फॅक्ट्स आपल्या वाचकांना सांगत आहे.
44 कोटींच्या बंगल्यात राहतात जयललिता...
- पॉलिटिक्समध्ये येण्याआधी जयललिता साऊथ इंडियन चित्रपटांत अॅक्ट्रेस होत्या. 1966 मध्ये एकापाठोपाठ 11 हिट तामिळ सिनेमा केल्यानंतर त्यांनी चेन्नईच्या पोएस गार्डनमध्ये बंगला विकत घेतला आणि त्याचे नाव वेद निलायम ठेवले.
- त्यांना राजसी थाटबाटात राहणे पसंत होते. यामुळेच त्यांनी त्या 1.32 लाखांत खरेदी केलेल्या बंगल्याच्या आधुनिकीकरणावर त्या काळात तब्बल 77 लाख रुपये खर्च केले होते.
- सध्याच्या काळात जयललिता यांच्या बंगल्याची किंमत 44 कोटी आहे.
इंडो-पाक वॉरदरम्यान देशाच्या मदतीसाठी दिले होते दागिने...
- जयललिता यांच्या बायोग्राफीनुसार, 1965च्या इंडो-पाक वॉरदरम्यान जयललिता यांनी आपले सुवर्ण दागिने तत्कालीन पीएम लालबहादूर शास्त्री यांना देशासाठी दान म्हणून दिले होते.
- 2016 मध्ये तामिळनाडू मुख्यमंत्र्याचा पदभार सांभाळताना जयललिता यांच्याकडे 3 कोटींची फक्त चांदी होती. कर्नाटक ट्रेझरीत 21 किलो सोन्याचे दागिने आणि आभूषणे जमा आहेत. एवढ्या सोन्याची सध्याच्या काळात 6.6 कोटी रुपये किंमत आहे.
कोण आहेत शशिकला आणि दिनाकरण
- व्ही. के. शशिकला जयललिता यांच्या जवळच्या नेत्या होत्या. तामिळनाडूत त्यांना लोक चिनम्मा म्हणून ओळखतात.
- शशिकला यांचा मुलगा सुधाकरणला जयललिता यांनी आपला वारस म्हणून 1995 मध्ये दत्तक घेतले होते, पण फक्त एका वर्षानेच त्यांनी त्याला बेदखल केले.
- त्यांनी जयललिता यांच्या आधाराने AIADMK पक्षात पकड मजबूत केली. याचमुळे फेब्रुवारी 2017 मध्ये त्यांना तामिळनाडूच्या मुख्यमंत्री म्हणून निवडण्यात आले. परंतु याच्या काही दिवसांनीच सुप्रीम कोर्टाने त्यांना 66 कोटींच्या बेनामी संपत्तीच्या प्रकरणात दोषी ठरवून 4 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
- दिनाकरण शशिकला यांचे भाऊ आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, जयललिता यांच्या मृत्यूची अधिकृत घोषणा एका दिवसानंतर करण्यात आली. या गोष्टीचा आता खुलासा करण्याचा उद्देश फक्त आपल्या बहिणीला निर्दोष सिद्ध करणे आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, Photos With Facts...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.