आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐश्वर्या रायने साकारली होती जयललितांची भूमिका, अशा आहेत Unknwon Facts

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवंगत जयललिता चेन्नईतील पोएस गार्डन येथील 44 कोटींच्या बंगल्यात राहत होत्या. - Divya Marathi
दिवंगत जयललिता चेन्नईतील पोएस गार्डन येथील 44 कोटींच्या बंगल्यात राहत होत्या.

नवी दिल्ली - आज जयललिता यांचा जन्मदिन आहे. त्यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1948 रोजी मंडिया, म्हैसूर (आता कर्नाटक) मध्ये झाला. चित्रपटांत आपल्या अभिनयाने सर्वांच्या हृदयात स्थान मिळवणाऱ्या जयललिता यांना "अम्मा" या नावानेच संबोधित केले जायचे.

> त्या तमिळनाडूच्या 3 वेळा मुख्यमंत्री राहिल्या. त्यांनी ऑल इंडिया अण्ण द्रविड मुनेत्र कळघम पक्षातून निवडणुका लढल्या आणि जिंकल्याही. जयललिता यांच्या आईही तामिळ चित्रपटांत काम करायची. 2 वर्षे वयातच त्यांचे वडील जयराम आईला सोडून गेले होते. जयललिता यांचे प्राथमिक शिक्षण बंगळुरू आणि चेन्नईत झाले. DivyaMarathi.Com यानिमित्ताने त्यांच्या आयुष्याशी निगडित काही फॅक्ट्स आपल्या वाचकांना सांगत आहे.

> सन 1997 मध्ये त्यांच्या आयुष्यावर बेतलेला 'इरुवर' हा तामिळ चित्रपट आला होता. यात जयललिता यांची भूमिका ऐश्वर्या रायने साकारली होती.

 

44 कोटींच्या बंगल्यात राहायच्या जयललिता...
> राजकारणात येण्याआधी जयललिता साऊथ इंडियन चित्रपटांत अॅक्ट्रेस होत्या. 1966 मध्ये एकापाठोपाठ 11 हिट तामिळ सिनेमा केल्यानंतर त्यांनी चेन्नईच्या पोएस गार्डनमध्ये बंगला विकत घेतला आणि त्याचे नाव वेद निलायम ठेवले. 
> त्यांना राजसी थाटबाटात राहणे पसंत होते. यामुळेच त्यांनी त्या 1.32 लाखांत खरेदी केलेल्या बंगल्याच्या आधुनिकीकरणावर त्या काळात तब्बल 77 लाख रुपये खर्च केले होते.
> सध्याच्या काळात जयललिता यांच्या बंगल्याची किंमत 44 कोटी आहे.

 

इंडो-पाक वॉरदरम्यान देशाच्या मदतीसाठी दिले होते दागिने...
> जयललिता यांच्या बायोग्राफीनुसार, 1965च्या इंडो-पाक वॉरदरम्यान जयललिता यांनी आपले सुवर्ण दागिने तत्कालीन पीएम लालबहादूर शास्त्री यांना देशासाठी दान म्हणून दिले होते. 
> 2016 मध्ये तामिळनाडू मुख्यमंत्र्याचा पदभार सांभाळताना जयललिता यांच्याकडे 3 कोटींची फक्त चांदी होती. कर्नाटक ट्रेझरीत 21 किलो सोन्याचे दागिने आणि आभूषणे जमा आहेत. एवढ्या सोन्याची सध्याच्या काळात 6.6 कोटी रुपये किंमत आहे.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, अशाच काही अननोन फॅक्ट्स... 

बातम्या आणखी आहेत...