आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवाला रॅकेट : एअर होस्टेससह मास्टरमाइंडलाही दिल्लीत अटक, जेवणाच्या पाकिटात भरले डॉलर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जेट एअरवेजची हाँगकाँग फ्लाइटमधील एअर होस्टेसला 4.80 लाख अमेरिकन डॉलरबरोबर अटक करण्यात आले. सोमवारी रात्री झालेल्या या कारवाईनंतर डीआरआई (डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजेंस) ने मंगळवारी दिल्लीमधून हवाला रॅकेटचा मास्टरमाइंड अमित मल्होत्रा (40) ला अटक केली. डीआरआय अधिकाऱ्यांच्या मते, मल्होत्रा गेल्या एक वर्षापासून दिल्लीतील अनेक कोट्यधीशांचे पैसे अशाप्रकारे परदेशात पाठवत होता. या पैशातून सोने खरेदी करून ते अवैधरित्या भारतात आणले जात होते. मल्होत्राने प्रवासात एअर होस्टेसबरोबर मैत्री केली होती. 


जेवणाच्या पाकिटात लपवले होते डॉलर
- न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार डीआरआयने म्हटले आहे की, सोमवारी रात्री हाँगकाँगला जाणार्या फ्लाइटमध्ये मोठ्या प्रमाणावर फॉरेन करन्सी नेली जाणार असल्याची माहिती मिळाली होती. 
- टीमने आयजीआय एअरपोर्टवर जेट एअरवेजच्या फ्लाइटची तपासणी केली. त्यावेळी एअर होस्टेस देवाशी कुलश्रेष्ठ (25) कडून 4,80,200 डॉलर सापडले. भारतीय चलनात याची किंमत 3.21 कोटी आहे. डॉलर हाँगकाँगला नेण्यासाठी एअरहोस्टेसने ते अॅल्युमिनिअम फॉइलमध्ये गुंडाळून जेवणाच्या पाकिटात लपवले होते. 


विदेशात व्हायची सोने खरेदी 
- डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अमित मल्होत्रा फॉरेन करन्सी स्मगलिंगचा मास्टरमाइंड आहे. त्याने एअरलाइन्स क्रूला रॅकेटमध्ये सहभागी करून घेत तस्करीची नवी पद्धत शोधून काढली. फ्लाइटमध्ये क्रूबरोबर मैत्री केली आणि कमिशनचे आमीष दाखवून त्यांना रॅकेटमध्ये सहभागी करून घेतला. 
- मल्होत्रा दिल्लीच्या कोट्यधीशांचे पैसे विदेशात पाठवायचा त्यातून सोने खरेदी करून ते अवैधरित्या भारतात आणले जायचे. 


6 महिन्यांपूर्वी झाली होती एअर होस्टेसशी मैत्री 
- एयर होस्टेसबरोबर मल्होत्राची मैत्री 6 महिन्यांपूर्वी झाली होती. त्यावेळी तो विदेशातून भारतात परतत होता. त्याने कमीशनचे आमीष दाखवत एअर होस्टेसला यात सामील करून घेतले होते. 
- डीआरआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, एक वर्षापासून मल्होत्रा विदेशात करन्सी पाठवत होता. जेट एअरवेजचे आणखी काही क्रू मेंबर यात सहभागी असल्याची त्यांना शंका आहे. 

 

50% भागीदारीच्या मोबदल्यात करायची काम 
आरोपी एअर होस्टेसने सांगितले की, ती अमित मल्होत्रा बरोबर काम करते. तो विवेक विहार परिसरात राहतो. त्याच्याबरोबर 50 टक्के भागीदारीमध्ये ती काम करायची असेही तिने सांगितले. या प्रकारानंतर जेट एअरवेज तिच्यावर कारवाई करू शकते. 

 

बातम्या आणखी आहेत...