आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमान हवेत असताना भांडणाऱ्या Live in जोडप्याची जेट एअरवेजने केली हकालपट्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ही घटना 1 जानेवारीची आहे. जेट एअरवेजचे हे विमान 9W119 लंडनहून मुंबईला येत होते. (फाइल) - Divya Marathi
ही घटना 1 जानेवारीची आहे. जेट एअरवेजचे हे विमान 9W119 लंडनहून मुंबईला येत होते. (फाइल)

नवी दिल्ली - जेट एअरवेजने मंगळवारी लंडनहून मुंबईला येणाऱ्या विमानात भांडण करणाऱ्या दोन पायलटची नोकरीवरून हकालपट्टी केली आहे. त्याआधी हे प्रकरण समोर आल्यानंतर एअरलाइनने दोन्ही पायलटना ड्युटीवरून हटवले होते. डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हील एव्हीएशन (डीजीसीए‌‌‌‌) नेही कारवाई करत मेल पायलटचे लायसन्स सस्पेंड केले होते. 


केव्हा घडली होती घटना?
- ही घटना 1 जानेवारीची आहे. जेट एअरवेजचे हे विमान लंडनहून मुंबईला येत होते. 


काय घडले होते कॉकपिटमध्ये?
- जेट एअरवेजच्या कॉकपिटमध्ये नेहमीप्रमाणे पायलट आणि को पायलट उपस्थित होते. ते दोघे लिव्ह इन पार्टनरही होते. विमान हवेतच होते त्याचवेळी दोघांमध्ये काही तरी कारणावरून वाद झाला. त्यांचे भांडण सुरू झाले. वाद एवढा वाढला की, पायलटने महिला को पायलटवर हात उचलला. 
- महिला पायलटने हवेतच कॉकपिट सोडले आणि रडत बाहेर आली. विमान उडवणार नाही असे ती म्हणाली. विमान पूर्ण वेगात होते. तेवढ्यात कॉकपिटमधून पायलट मदतीसाठी को पायलटला परत पाठवण्याचे सिग्नल देऊ लागला. महिला को-पायलटने जाण्यास स्पष्ट नकार दिला. पण तेवढ्यात पायलटही को पायलटला कॉकपिटमध्ये परत नेण्यासाठी बाहेर आला आणि केबीन क्रूचा थरकाप उडाला. कॉकपिटच्या बाहेर गॅलरीमध्ये उभे राहूनच दोघे भांडायला लागले. केबीन क्रूने आधी पायलटला कॉकपिटमध्ये परत पाठवले आणि नंतर विनंती करून को-पायलटलाही कॉकपिटमध्ये परत पाठवले. 
- काही मिनिटेच झाली होती तेवढ्यात महिला पायलट परत रडत बाहेर आली. केबीन क्रूने तिला पुन्हा समजावले आणि कॉकपिटमध्ये पाठवले. या संपूर्ण फिल्मी ड्रामामध्येच हा प्रवास पूर्ण झाला. अखेर विमान मुंबईत लँड झाले. 

 

लिव्ह-इन रिलेशनमध्ये आहेत दोघे पायलट
दोघे पायलट लिव्ह-इन पार्टनर देखिल आहेत. मेल पायलटला निलंबित केले होते, तर फिमेल पायलटला ग्राऊंड अटॅच करण्यात आले होते. 

 

बातम्या आणखी आहेत...