आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेएनयूमध्ये नवा अभ्यासक्रम, राष्ट्रीय सुरक्षेवर संशोधन करतील विद्यार्थी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता लवकरच भारतीय लष्कर, हवाईदल आणि नौदलातील वरिष्ठ अधिकारी व तज्ज्ञांसोबत काम करण्यास मिळेल. पीएचडी व एमफिल करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘जेएनयू’च्या वतीने पुढील वर्षी राष्ट्रीय सुरक्षा विशेष अभ्यास केंद्र सुरू करण्यात येत आहे. यामध्ये सागरी सुरक्षा, सायबर सुरक्षा, भारतात शांतता कायम राखण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध मोहिमांबद्दल भारतीय संरक्षण उद्योग, सीमा सुरक्षा-व्यवस्थापन, घुसखोरी व नक्षलवाद यासारख्या मुद्द्यांवर अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल.

 

या विषयात विद्यार्थी पीएचडी व एमफिल करतील. संशोधन करताना या विद्यार्थ्यांना काही काळ सीमेवर घालवावा लागणार आहे. जेएनयूच्या प्राध्यापकांनी सांगितले, हे केंद्र सुरू करण्यासाठी १० कोटींहून अधिक खर्च आला आहे. पुढील वर्षापासून सुरू होत असलेल्या अभ्यासक्रमात ६० जागा असतील.


अभ्यासक्रम सुरू होण्यामागचा उद्देश 

जेएनयूच्या प्राध्यापकांनी सांगितले, राष्ट्रीय सुरक्षा हा मुद्दाच असा आहे की, यात विस्तृत संशोधन होण्याची गरज आहे. दुसऱ्या देशात संरक्षणावर होत असलेल्या खर्चाबरोबरच तेथे होत असलेल्या राष्ट्रीय सुरक्षेच्या कोणकोणत्या मुद्द्यावर नव्या तंत्राने काम केले जात आहे तसेच भारतात या क्षेत्रात कोणकोणत्या गोष्टी राष्ट्रीय सुरक्षेत समाविष्ट करण्याची जास्त गरज आहे यावर विद्यार्थी काम करतील.  

 

असे काम करेल केंद्र  
प्राध्यापकांनी सांगितले, केंद्र सरकारच्या वतीने जेएनयूला स्वायत्तता देण्यात आली आहे. यामुळे जेएनयूच्या वतीने विद्यार्थ्यांच्या हितासाठी व देशाला चांगले संशोधनात्मक नेटवर्क मिळावे या दिशेने नवे काेर्सेस सुरू करण्याचा पर्याय आहे. राष्ट्रीय सुरक्षेवर सुरू झालेले केंद्र संशोधन व शैक्षणिक संस्थेनुसार कार्य करेल. आधी पाच वर्षांत या केंद्राच्या वतीने संशोधनात्मक हालचालीवर  काम करण्यात येईल.  

 

बातम्या आणखी आहेत...