आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Justin Trudeau To Meet Narendra Modi Amid Row Over Inviting Khalistani Supporter

कॅनडाचे पीएम ट्रूडो आज नरेंद्र मोदींना भेटणार, अण्वस्त्र करार आणि खलिस्तानच्या मुद्द्यावर चर्चेची शक्यता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नरेंद्र मोदींनी हैदराबाद भवन येथे जस्टिन ट्रूडो यांची भेट घेतली. - Divya Marathi
नरेंद्र मोदींनी हैदराबाद भवन येथे जस्टिन ट्रूडो यांची भेट घेतली.

नवी दिल्ली - कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांची हैदराबाद हाऊस येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट घेतली. येथे उभय नेत्यांमध्ये दोन्ही देशांच्या शिष्टमंडळासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होत आहे. शुक्रवारी सकाळी ट्रूडो राष्ट्रपती भवनात पोहोचले. येथे पंतप्रधान मोदींनी ट्रूडो यांची गळाभेट घेऊन स्वागत केले.  यावेळी मोदींनी ट्रूडो यांच्या पत्नी सोफी व त्यांच्या मुलांचीही भेट घेतली. मोदी आणि ट्रूडो यांच्या बैठकीत अण्वस्त्र करार, उद्योग, शिक्षण आणि वादग्रस्त खलिस्तान मुद्द्यावर चर्चेची शक्यता आहे. अशी माहिती आहे की गुरुवारी पंतप्रधान ट्रूडो यांच्यासोबत भोजनाचे खलिस्तानी दहशतवाद्याला निमंत्रण गेले होते. नंतर हे निमंत्रण रद्द करण्यात आल्याचीही माहिती आहे. 


परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची घेतली भेट 
- शुक्रवारी ट्रूडो यांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही देशांचे अनेक अधिकारी उपस्थित होते. 
- पंतप्रधान जस्टिन ट्रूडो आपल्या कुटुंबियांसह राजघाटावर गेले. तिथे त्यांनी महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली. 

 

ट्रूडो यांना गार्ड ऑफ ऑनर 
- राष्ट्रपती भवनाबाहेर ट्रूडो यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. 

 

मोदींनी केले दोन ट्विट 
- ट्रूडो यांच्या भेटीपूर्वी मोदींनी ट्विट केले होते. त्यात ते म्हणाले होते, की मला अपेक्षा आहे की जस्टिन ट्रूडो आणि त्यांचा परिवाराला भारत भेटीने आनंद झाला असेल. त्यांची मुलं जेव्हियर, एला-ग्रेस आणि हेड्रियन यांना भेटण्याची विशेष उत्सूकता आहे. 
- मोदींनी एक फोटो ट्विट केला होता, त्यासोबत लिहिले होते, 2015 मध्ये मी कॅनडा दौऱ्यावर होतो तेव्हा मी प्रथमच ट्रूडो आणि त्यांची मुलगी एला-ग्रेसला भेटलो होतो. 

 

बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा 
- शुक्रवारी मोदी आणि ट्रूडो यांच्यात चर्चा होणार आहे. या बैठकीत संरक्षण, सिव्हिल न्यूक्लियर डील, ऊर्जा, शिक्षण या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. 
- त्यासोबतच कॅनडामध्ये वाढत असलेला शीख समुदाय आणि खलिस्तानचा मुद्दाही उभय नेत्यांमध्ये चर्चिला जाण्याची शक्यता आहे. 
- ट्रूडो सात दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून शुक्रवार हा त्यांच्या दौऱ्याचा शेवटचा दिवस आहे. आज उशिरा रात्री ते कॅनडाला रवाना होतील. 

बातम्या आणखी आहेत...