आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Justin Trudeau To Meet Narendra Modi Amid Row Over Inviting Khalistani Supporter

भारत-कॅनडामध्ये 6 करार,देशाला युरेनियम मिळणार;कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांची भारत भेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे समकक्ष जस्टीन ट्रूडो यांच्यात द्विपक्षीय तसेच इतर मुद्द्यांवर सुमारे दोन तांस चर्चा झाली. दोन्ही नेत्यांत सुरक्षा, शिक्षण, व्यापार, दहशतवादासारख्या सहा क्षेत्रात सहकार्य करण्यासंबंधीच्या करारांवर सहमतीही झाली. कॅनडा भारताला युरेनियमचा पुरवठा करणार आहे. त्याचा फायदा भारताला ऊर्जेच्या क्षेत्रात स्वयंपूर्णतेसाठी होऊ शकतो. उभय देशांत एक अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होणार आहे.


उभय नेत्यांतील सविस्तर चर्चेनंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत बैठकीबद्दलची माहिती देण्यात आली. दहशतवादाच्या मुद्द्यावर दोन्ही देशांनी एकत्र लढणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गेल्या काही दिवसांपासून ट्रूडो भारतातील विविध प्रदेशाला भेट देत असल्याचा संदर्भ देऊन मोदी म्हणाले, ट्रुडाे यांनी देशातील वैविध्यता देखील जरूर अनुभवली पाहिजे, असे मोदी यांनी यावेळी सांगितले. 

 

उभय देशांतील संबंध लोकशाही व संपर्कावर आधारित  : मोदी
मोदी म्हणाले, मी कॅनडाला गेलो होतो. तेव्हा भारताबद्दल तेथे जिव्हाळा पाहायला मिळाला. ट्रुडो यांनाही भारत दौऱ्यात खूप आनंद मिळाला असावा, अशी आशा आहे. दहशतवादाचा धोका लक्षात घेऊन दोन्ही देशांनी एकजुटीने लढले पाहिजे. आपले संबंध लोकशाही, विविधता आणि आपसातील संवादावर आधारित आहेत. कॅनडाचा निवृत्तीवेतन निधी भारताचा एकप्रकारे भागीदार बनलेला आहे. उत्तर कोरियात शस्त्राचा अति वापर होत आहे. मालदीवमधील लोकशाही व्यवस्थेवर संकट आले आहे. या दोन्ही मुद्द्यांवर कॅनडा आणि भारताचे विचार समान आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. 

 

‘एकात्मतेला आव्हान  दिल्यास हयगय नाही’

 भारताच्या एकात्मतेला, सार्वभौमत्वाला कोणी आव्हान देण्याचा प्रयत्न केल्यास त्याची हयगय केली जाणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडाे यांच्या उपस्थितीत स्पष्ट केले. 

 

 

> पंतप्रधान मोदींनी ट्रुडो यांचे भारत भेटीच्या पाच दिवसांनंतर ट्विट करून स्वागत केले. ते एक आठवड्यांच्या भारत भेटीवर आहेत. त्यांनी कुटुंबासह राजघाटावर बापूंना श्रद्धांजली अर्पण केली. 

 

भारत  नेहमीच  एक विश्वासू  भागीदार : ट्रुडो 

भारतात अतिशय चांगले स्वागत झाले आहे. त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. आम्ही मैत्री-भागीदारीला पुढच्या टप्प्यात नेले आहे. आम्ही व्यापाराला पुढेे नेऊ इच्छितो. भारत कॅनडाचा नेहमीच विश्वासू भागीदार, मित्र आहे, असे ट्रुडो म्हणाले. 

 

कॅनडात १ लाख भारतवंशीय विद्यार्थी

आठ दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या जस्टीन ट्रुडो यांच्यासाठी भारत भेट महत्त्वाची आहे. कारण कॅनडात सुमारे १० लाखाहून जास्त भारतवंशीय लोक राहतात तर १.२० लाख विद्यार्थी कॅनडात शिक्षण घेतात. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा आणखी फोटो... 

बातम्या आणखी आहेत...