आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PM ट्रूडो यांच्या मुलाचा भारत भेटीत दिसला खट्याळ अंदाज, मोदींची घेतली अशी भेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो आपला छोटा मुलगा हॅड्रिन आणि फॅमिलीसोबत. दुसऱ्या फोटोमध्ये पंतप्रधान मोदी हॅड्रिनचा लाड करताना दिसत आहेत. - Divya Marathi
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो आपला छोटा मुलगा हॅड्रिन आणि फॅमिलीसोबत. दुसऱ्या फोटोमध्ये पंतप्रधान मोदी हॅड्रिनचा लाड करताना दिसत आहेत.

नवी दिल्ली - कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो सात दिवसांच्या दौऱ्यानंतर मायदेशी परतले आहेत. ट्रूडो कुटुंबासह भारत दौऱ्यावर आले होते. शुक्रवारी त्यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांचे शेंडेफळ हॅड्रिन याच्या बालसुलभ खट्याळपणाने पंतप्रधान मोदींसह सर्वांनाच हसवले. दिल्लीत आयोजित सोहळ्यात हॅड्रिन याने चक्क जमीनीवर लोळण घेतले, मग त्याला उठवण्यासाठी दोन्ही देशांच्या पंतप्रधानांना विनवणी करावी लागल्याचे फोटो इंटरनेटवर चर्चेत आहेत.  

 

मुलं ही सर्वांची सारखीच...
- सामान्यांची लहान मुलं असतील नाही तर पंतप्रधानांचे, मुलं ही मुलंच असतात हे शुक्रवारी सर्वांना पाहिले.
- दिल्लीत कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो  आणि त्यांच्या कुटुंबियांचे शुक्रवारी पंतप्रधान मोदींनी स्वागत केले. 
- यावेळी ट्रूडो यांचा लहान मुलगा याच्या खट्याळपणा कॅमेरात कैद झाला. 
- राजघाटावर श्रद्धांजली देण्यासाठी ट्रूडो फॅमिली गेली तेव्हा तिथे हॅड्रिनच्या नटखट अंदाचाने सर्वांना हसण्यास मजबूर केले. 
- ट्रूडो यांनी ताजमहालपासून साबरमती आश्रमाचा दौरा केला. प्रत्येक ठिकाणी हॅड्रिनचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला आता त्याचे फोटो इंटरनेटवर आणि सोशल मीडियामध्ये चर्चेत आहेत. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, ज्यूनिअर ट्रूडोचे भारत दौऱ्यातील फोटो... 

बातम्या आणखी आहेत...