आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मला जनादेशच मिळाला नाही, सत्ता काँग्रेस कृपेने; कुमारस्वामी यांची हतबलता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कुणाच्या दबावात न येऊ देण्यासाठी जेडीएसने कर्नाटकच्या जनतेकडून भक्कम जनादेश मागितला होता. तो मिळाला नाही. त्यामुळे आपण कर्नाटकातील ६.५ कोटी जनतेच्या दबावात नसून काँग्रेसच्या कृपेवर सत्तेत आहोत, अशी हतबलता कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी व्यक्त केली.

 

सीएम झाल्यानंतर कुमारस्वामी प्रथमच दिल्लीत पंतप्रधान व   केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीसाठी आले होते. ते म्हणाले, आमच्या पक्षाला आणि मला कर्नाटकच्या जनतेने नाकारले. मला शेतकरी नेत्यांनी पाठिंबा दिला नव्हता हेसुद्धा मला माहीत आहे. परंतु, शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन निवडणुकीपूर्वी दिले होते. या आश्वासनाची पूर्तता न केल्यास राजीनामा देईन.


काँग्रेस आमदाराचा अपघाती मृत्यू :  बागलकोटचे (कर्नाटक) काँग्रेस आमदार सिद्दू भीमप्पा न्यामगौड (७१) यांचा सोमवारी एका रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे.  १९९०-९१ मध्ये माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्रीही होते.

बातम्या आणखी आहेत...