आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किम यांग शिक यांना साहित्य अकादमीची फेलोशिप जाहीर; 14 मार्चला फेलाेशिप प्रदान सोहळा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- दक्षिण काेरियाच्या नामांकित लेखिका व रवींद्रनाथ टागाेर यांच्या साहित्याच्या अनुवादक तथा अभ्यासक किम यांग शिक यांना भारतीय साहित्याच्या विकासात दिलेल्या उल्लेखनीय याेगदानाबद्दल मानद फेलाेशिप जाहीर करण्यात अाली अाहे. येत्या १४ मार्चला हाेणाऱ्या एका कार्यक्रमात त्यांना ही फेलाेशिप प्रदान केली जाणार अाहे.  


भारतीय साहित्य अकादमीतर्फे देण्यात येणारा हा सर्वाेच्च सन्मान मिळवणाऱ्या ८७वर्षीय किम यांग शिक या पहिल्या विदेशी लेखिका ठरल्या अाहेत. किम या रवींद्रनाथ टागाेर यांच्या साहित्याच्या तज्ज्ञ अभ्यासक असून, त्यांनी ‘गीतांजली’चा काेरियन भाषेत अनुवाद केला अाहे. तसेच रवींद्रनाथ टागाेर यांच्या अनेक नाटकांसह साहित्य अकादमीचे पहिले सचिव कृष्ण कृपलानी यांच्या टागाेरांवरील पुस्तकाचाही काेरियन भाषेत अनुवाद केला अाहे. किम या नेहमीच भारतातील साहित्यविषयक कार्यक्रमांना हजेरी लावत असतात. यासह त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची मुलाखतदेखील घेतली हाेती, असे अकादमीचे सचिव के.श्रीनिवास राव यांनी सांगितले. ४ जानेवारी १९३१मध्ये जन्मलेल्या किम टागाेर साेसायटीच्या संस्थापक-अध्यक्षा व भारतीय कला संग्रहालयाच्या संस्थापक-निर्देशिका अाहेत.   


दाेन वर्षांपूर्वीच त्यांना हा सन्मान देण्याची घाेषणा करण्यात अाली हाेती; परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या येऊ शकल्या नव्हत्या. भारतीय लेखकांना दिल्या जाणाऱ्या फेलाेशिपपेक्षा ही फेलाेशिप वेगळी अाहे. त्यानुसार एकाच वेळी जास्तीत जास्त दहा विदेशी लेखकांना, तर भारतीय लेखकांमध्ये अधिकाधिक २१ जणांना हा सन्मान दिला जाऊ शकताे, असेही राव यांनी सांगितले.  

बातम्या आणखी आहेत...