आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- जर तुम्ही पतंग उडवणार असाल किंवा प्रजासत्ताकदिनी हवेत फुगे सोडण्याबाबत विचार करत असाल तर सावधान. कारण तसे केल्यास तुम्हाला २ वर्षांची कैद किंवा १० लाख रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. तसे करणे देशाच्या विमान कायदा १९३४ चे उल्लंघन आहे. या कायद्यानुसार, पतंग उडवणे किंवा फुगे हवेत सोडण्यासाठी त्याचा परवाना घेणे गरजेचे आहे. या कायद्यानुसार दिल्ली, मुंबई, हैदराबाद, बंगळुरू आणि रायपूर या देशातील पाच मोठ्या शहरांतील विद्यार्थ्यांनी उड्डयनमंत्री आणि डीजीसीएला पत्र लिहून पतंग उडवण्यासाठी आणि फुगे हवेत सोडण्यासाठी परवाने देण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्र नॅशनल लॉ कॉलेज मुंबई, सिम्बायोसिस लॉ स्कूल नोएडा, हिदायतुल्लाह नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी रायपूर, नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया बंगळुरू व द नॅशनल अॅकॅडमी ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च हैदराबादच्या २२४ विद्यार्थ्यांनी सेंटर फॉर सिव्हिल सोसायटी या एनजीओच्या सहकार्याने उड्डयनमंत्री अशोक गजपती राजू आणि डीजीसीएला पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी प्रजासत्ताक दिनी पतंग उडवणे व फुगे हवेत सोडण्यासाठी परवाना देण्याची मागणी केली.
कायद्याच्या दुरुपयोगाची शक्यता, तो रद्द केला जावा
विद्यार्थ्यांनी पत्रात लिहिले आहे की, देशात विमान कायदा १९३४ अजूनही अस्तित्वात आहे. त्याचा वापर करत कोणत्याही पतंग उडवणाऱ्याला पोलिस हवे तेव्हा तुरुंगात पाठवू शकतात. हा कायदा स्वातंत्र्यापूर्वीचा होता. आजही तो तसाच आहे. या कायद्याची प्रासंगिकता राहिलेली नाही. त्यामुळे मंत्रीजी, हा जुना कायदा रद्द करा किंवा नंतर सर्वच सर्वांना पतंग आणि फुगे उडवण्याचा परवाना द्या. सिम्बायोसिस लॉ स्कूलच्या सहायक प्राध्यापक डॉ. नीती शिखा यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी ही अनोखी पद्धत अवलंबली आहे. इंग्रजांनी हा कायदा पतंग आणि फुग्यांच्या माध्यमाने क्रांतिकारकांदरम्यान परस्परांना संदेश पाठवण्याची प्रक्रिया बंद करण्यासाठी केला होता, त्याची प्रासंगिकता आता संपली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.