आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीर्घ भांडवली लाभ कर 1 एप्रिलपासून लागू होणार; अर्थ मंत्रालयाचे स्पष्टीकरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- यंदाच्या अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आलेला दीर्घकालीन भांडवली लाभ कर (एलटीसीजी) येत्या १ एप्रिल महिन्यापासूनच लागू होणार असल्याचे स्पष्टीकरण सोमवारी अर्थ मंत्रालयाकडून देण्यात आले. म्हणजेच ३१ मार्च २०१८ पर्यंत विकण्यात आलेल्या शेअर्सवर मिळणाऱ्या दीर्घकालीन भांडवली लाभावर कर आकारला जाणार नाही. 


शेअरचे खरेदी मूल्य किंवा ३१ जानेवारीला बाजारातील कमाल मूल्य यापैकी जे जास्त असेल त्या आधारावर भांडवली लाभाची गणना केली जाईल. जेव्हा एखादी व्यक्ती एखादा शेअर खरेदी करून त्याला १२ महिन्यांपेक्षा जास्त काळ स्वत:कडेच ठेवते; त्यातून मिळणाऱ्या नफ्याला लाँग टर्म कॅपिटल गेन म्हणतात. गुुंतवणूकदारांनी शेअर्स विक्रीतून एक लाख रुपयांपेक्षा जास्त नफा कमावल्यास त्यांना १० टक्के दराने एलटीसीजी कर आकारला जाणार आहे. आजवर असा कर आकारला जात नव्हता. शेअर बाजारांतील घसरणीच्या पार्श्वभूमीवर सरकारने सोमवारी हा कर लावण्याचे कारण स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...