आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमचा मोबाईल नंबर सरकार लवकरच बदलणार, 10 नव्हे आता 13 आकडी नंबर होणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- तुमच्या मोबाईलचा नंबर आता लवकरच बदलणार आहे. होय, हे वाचून धक्का बसेल पण हे खरं आहे. खरं तर केंद्रीय टेलिकॉम मंत्रालयाने सर्व राज्यांना निर्देश जारी केले आहेत ज्यात म्हटले आहे की, आता मोबाईल नंबर 10 अंकाच्या ऐवजी 13 अंकांचा होऊ शकतो. असे सांगितले जात आहे की, मागील महिन्यात दिल्लीत झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला आहे. BSNL ने सुद्धा याची तयारी सुरू केली आहे. ही प्रक्रिया 31 डिसेंबर, 2018 पर्यंत सर्व नंबर्ससोबत पूर्ण केली जाऊ शकते. याची सुरूवात 1 जुलै रोजी सुरू होईल.

 

# ऑक्टोबरपासून सुरू होईल प्रक्रिया-

 

डिपार्टमेंट ऑफ टेलीकॉम (DoT) च्या माहितीनुसार, सध्या उपलब्ध असलेल्या 10 अंकांच्या मोबाईल नंबर एक ऑक्टोबर, 2018 पासून 13 अंकी नंबरमध्ये मायग्रेट करणे सुरू होतील. ही प्रक्रिया 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण केली जाणे अपेक्षित आहे. मात्र, याबाबत स्पष्टता नाही की, 13 अंकांचा मोबाईल नंबर मध्ये कंट्री कोड (जसे भारताचा +91 आहे) सामील असेल की नाही. 

 

# या कारणामुळे बदलत आहेत नंबर्स-

 

असे सांगितले जात आहे की, 10 अंकांपासून 13 अंकांचा मोबाईल नंबर केल्यानंतर नवे मोबाईल नंबर्स तयार करण्याची गरज पडणार नाही. सध्याच्या 10 आकड्याच्या सीरीजमधील नंबर जवळपास संपले आहेत. अशा वेळी 13 आकडी सर्व यूजर्सचे नंबर्स अपग्रेड केले जाणार आहेत. 

बातम्या आणखी आहेत...