आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Madhya Pradesh Minister Mishra Gets Relief From The High Court In The Paid News Case

पेड न्यूज प्रकरणात मध्य प्रदेशचे मंत्री मिश्रा यांना हायकोर्टाचा दिलासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली -   पेड न्यूज प्रकरणात मध्य प्रदेशातील जनसंपर्क खात्याचे मंत्री नरोत्तम मिश्रा यांना दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. न्या. एस. रवींद्र भट आणि न्या. सुनील गौड यांच्या पीठाने शुक्रवारी निवडणूक आयोगाचा आदेश रद्द केला. निवडणूक आयोगाने मिश्रा यांना २००८ च्या निवडणुकीत अपात्र घोषित केले होते. याशिवाय न्यायालयाने एकल पीठाचा १४ जुलै २०१७ चा निवडणूक आयोगाचा निर्णय योग्य ठरवण्याचा निर्णयही रद्दबातल केला आहे.

 

पीठाने आदेशात म्हटले आहे की, २००८ मध्ये पार पडलेल्या मध्य प्रदेशाच्या निवडणुकांत वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्या या पेड न्यूज होत्या, याचे सबळ पुरावे सुनावणीदरम्यान  आढळले नाहीत. १० ऑक्टोबर २०१७ रोजी उच्च न्यायालयाने यावरील निकाल राखून ठेवला होता.  सात महिन्यांनंतर दिल्ली उच्च न्यायालयाने वरील निर्णय दिला.

बातम्या आणखी आहेत...