आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुंजवां : 4 दिवसांनी शुद्धीत आले मेजर अभिजित, सर्वप्रथम विचारले-दहशतवाद्यांचे काय झाले?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुंजवां हल्ल्यात जखमी झालेल्या मेजर अभिजित यांनी म्हटले की, गेल्या 3-4 दिवसांत काय झाले मला माहिती नाही. - Divya Marathi
सुंजवां हल्ल्यात जखमी झालेल्या मेजर अभिजित यांनी म्हटले की, गेल्या 3-4 दिवसांत काय झाले मला माहिती नाही.

नवी दिल्ली - शनिवारी जम्मूच्या सुंजवां आर्मी कॅम्पवर जालेल्या हल्ल्यात जखमी झालेले मेजर अभिजित 4 दिवसांनंतर शुद्धीत आले. शुद्धीत येताच मेजर यांनी पहिला प्रश्न विचारला तो म्हणजे, दहशतवाद्यांचे काय झाले? मेजर म्हणाले मला त्याठिकाणी जाऊ द्या. 10 फेब्रुवारीला झालेल्या या हल्ल्यात आर्मीचे 5 जवान शहीद झाले होते. एका नागरिकाचाहीचाही मृत्यू झाला होता. लष्कराने 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. 


दहशतवादी हल्ल्यातील 3 प्रेरणास्थान 
1# मेजर अभिजित

- हल्ल्यात मेजर अभिजित जखमी झाले होते. त्यांना मंगळवारी शुद्ध आली. उधमपूर कमांड हॉस्पिटलचे मेजर जनरल नदीप नैथानी म्हणाले, त्यांचे मनोधैर्य मोठे होते. सर्जरीनंतर लगेचच त्यांनी विचारले की, दहशतवाद्यांचे काय झाले. 
- मेजर अभिजित म्हणाले, आता मला बरेच चांगले वाटत आहे. मी डॉक्टरांशी बोलत आहे. मी बसू शकतो आणि दिवसातून दोन वेळा चालूही शकतो. गेल्या 3-4 दिवसांत काय घडले, मला काहीही माहिती नाही. 

 

2# शहीद सुबेदार मदनलाल
- हल्ल्यात सुभेदार मदनलाल शहीद झाले होते. सोमवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा लेफ्टनंट मुलगा अंकुश चौधरीने लष्करी वर्दीत त्यांना सलामी दिली. 
- अंकुश म्हणाले, मला वडिलांवर अभिमान आहे. छातीत दोन गोळ्या लागल्यानंतरही ते थांबले नाहीत. मला त्यांच्यापेक्षा अर्धी कामगिरी करता आली तरी खूप आहे. माझ्यासाठी ती अभिमानाची बाब असेल. 
- जेव्हा दहशतवादी कॅम्पमध्ये घुसले तेव्हा मदनलाल त्यांच्या क्वार्टरमध्येच होते. दहशतादी फायरिंग करत थेट त्यांच्या घरात घुसत होते. मदनलाल यांच्याकडे शस्त्र नव्हते. तरीही ते दहशतवाद्यांशी लढले. जागेवरच त्यांचे निधन झाले, पण त्यांच्या शौर्यामुळे कुटुंबातील चौघांचे प्राण वाचू शकले. 

 

3# राइफलमॅनची पत्नी 
- हल्ल्याच्या वेळी आर्मी कॅम्पच्या क्वार्टरमध्ये रायफलमन नजीर अहमद त्यांची गर्भवती पत्नी शाहजादा खान यांना हॉस्पिटलमध्ये नेण्याची तयारी करत होते. त्याचवेळी दहशतवादी फायरिंग करू लागले. नजीर आणि त्यांच्या पत्नीला गोळ्या लागल्या. शाहजादा यांच्या पाठित गोळ्या लागल्या होत्या. त्यांना एअरलिफ्ट करून मिलिट्री हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. 
- डॉक्टर म्हणाले की, पाठित गोळ्या लागल्याने ही केस कठीण बनली होती. मुलाची पल्सही डाऊन होऊ लागली होती. पण डॉक्टर्सने रात्रभर सेफ डिलिव्हरीसाठी प्रयत्न केले. शाहजादाने प्रिमेच्योर मुलीला जन्म दिला, आई आणि मुलगी दोघेही सुखरुप आहे. 


संरक्षण मंत्री म्हणाल्या, पाकला किंमत मोजावी लागेल 
- संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी सायंकाळी सुंजवां हल्ल्याप्रकरणी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी म्हटले की, हल्ल्यांमागचा मास्टरमाइंड हा जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या अझहर मसूद आहे. त्याला त्याठिकाणी पाठिंबा मिळतो. दहशतवाद्यांना हँडलर्स सीमेपलिकडून निर्देश देत होते, असेही निर्मला सीतारमण म्हणाल्या.  
- सीतरमण म्हणाल्या, या प्रकरणाचे पुरावे गोळा केले जात आहेत. पण पाकिस्तानला पाकिस्तानला पुरावे देणे ही कायमस्वरुपी प्रक्रिया आहे. ते जबाबदार अशल्याचे प्रत्येकवेळी सिद्ध झाले आहे. पाकिस्तानला त्याची किंमत मोजावी लागेल. 


हल्ल्यातील शहीद... 
- सुभेदार मदनलाल चौधरी 
- सुभेदार मोहम्मद अशरफ मीर 
- हवालदार हबीबुल्लाह कुरैशी 
- नायक मंजूर अहमद 
- लांसनायक मोहम्मद इकबाल 
- लांसनायक मो. इक्बाल यांचे वडील