आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघाबद्दल तुमच्या पिढीने इशारे दिले, तो अचानक चांगला कसा? मनीष तिवारींचे मुखर्जींना 3 सवाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे संघस्थानी जाणे काँग्रेसला पसंत पडलेले नाही. काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी ट्विट करुन प्रणव मुखर्जींना तीन सवाल केले आहेत. ते म्हणाले, राष्ट्रवादावर बोलण्यासाठी प्रणव मुखर्जींनी संघाच्या मुख्यालयाचीच निवड का केली? संघ अचानक चांगला कसा झाला? प्रणव मुखर्जी गुरुवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष शिक्षा वर्गाच्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी संघाच्या मंचावरुन राष्ट्र, राष्ट्रवाद आणि देशभक्ती यावर आपली मते मांडली. संघाला कानपिचक्या देण्यासोबतच स्वपक्षालाही अप्रत्यक्ष सल्ला दिला. साधारण 30 मिनिटांच्या भाषणात त्यांनी महत्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, लोकमान्य टिळक, सुरेंद्र नाथ बॅनर्जी आणि सरदार पटेल यांचा उल्लेख केला. 

 

मनीष तिवारींचे तीन सवाल 
#1
- मनीष तिवारींनी प्रणव मुखर्जींना विचारले, 'तुम्ही आतापर्यंत धर्मनिरपेक्ष लोकांना कोणतेही उत्तर दिलेले नाही. मला तुम्हाला विचारायचे आहे की तुम्ही राष्ट्रवादावरील आपले मत मांडण्यासाठी संघाच्या मुख्यालयाची निवड का केली?'
 #2 - 'तुमच्या पिढीने 80-90 च्या दशकात संघाच्या विचारधारेबद्दल इशारा दिला होता. जेव्हा 1975 आणि त्यानंतर 1992 मध्ये संघावर बंदी घालण्यात आली होती. तत्कालिन सरकारमध्ये तुम्ही होते. तेव्हा तुम्हाला असे नाही वाटत का, की कधी '
#3 - तिवारींनी तिसरा प्रश्न विचारला आहे, की 'संघाच्या कार्यक्रमात सहभागी होणे हा वैचारिक पुनरुत्थानाचा प्रयत्न आहे की राजकारणातील खालावलेला स्तर दूर करणे. यामाध्यमातून कडवडपणा दूर करण्याचा तुमचा प्रयत्न आहे का? तुमच्या या प्रयत्नाने संघाला धर्मनिरपेक्ष आणि बहुवादी मानले जाईल का.'

यासोबत मनीष तिवारींनी एक उदाहरणही दिले आहे. ते म्हणाले, 'नाझी युरोपात आपले वर्चस्व दाखवत होते. चेंबरलेन (माजी ब्रिटीश पंतप्रधान) यांनी विचार केला की 1938 च्या म्यूनिक कराराने त्यांनी शांततेसाठी मोठे काम केले आहे. परंतू त्यांचे हे विचार किती चुकीचे होते.'

बातम्या आणखी आहेत...