आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1500% पर्यंत जास्त दराने विकली जात आहेत औषधे; 7 रुपयांचे औषध 120 रुपयांत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशात आैषधे १५००% पेक्षा अधिक किमतीत विकली जात आहेत. हा खुलासा देशातील सर्वात मोठ्या खासगी कंपनीच्या अहवालात केला आहे. यानुसार, मूत्ररोगाचे ९ रुपयांचे आैषध सिडनेफिल १४९ रुपयांत, हाडांना बळकटी देणारे ~७ चे आैषध कॅल्शियम कार्बोनेट १२० रुपयांत, मधुमेहाचे ~७ चे आैषध ग्लिमप्राइड ९७ रुपयांत, हृदयरोगांसाठी असलेले ११ रुपयांचे एट्रोव्हॅस्टीन ~१३१ ला विकले जात आहे. आैषधांची ही यादी मोठी आहे.

 

‘दिव्य मराठी’ने या आैषध निर्मात्या कंपन्यांशी संवाद साधला. याच कंपन्यांचे आैषध विविध कंंपन्या विविध किमतीत विकतात.  अहवाल तयार करणारी खासगी कंपनी देशातील एकूण आैषधांच्या १५% आैषधांची निर्मिती करते. उत्पादन याच कंपनीचे असते. मात्र, बाजारात कंपनीचे नाव आणि वेष्टन बदलून विकले जाते. याची किंमत काही पटींमध्ये वाढवली जाते. या आैषधांच्या किमतीवर सरकारचे नियंत्रण नाही. म्हणजे बाजारात याची किंमत काय असावी हे कंपन्या स्वत: ठरवतात. देशात केवळ ८५० प्रकारची आैषधे अशी आहेत, ज्यांना सरकारने अत्यावश्यक श्रेणीत ठेवले आहे. याच आैषधांच्या किमतीवर सरकारचे नियंत्रण असते.

 

आैषध निर्माता कंपनीने सांगितले की, १२% जीएसटी आणि २०% लाभ घेतल्यानंतर ज्या आैषधाची किंमत ~९ होती त्याचे बाजारात मार्केटिंग करणाऱ्या कंपन्या १५० रुपयांपर्यंत मूल्य ठरवतात. रसायन आणि खत मंत्रालयाच्या अधीन कार्यरत आैषधी विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अत्यावश्यक आैषधांच्या किमतींवर सरकारने नियंत्रण ठेवले आहे. आता दुसऱ्या अत्यावश्यक आैषधांच्या किमतीचे कमाल मूल्य ठरवण्याचे काम सुरू आहे. यासाठी एक प्रस्ताव तयार केला आहे. यावर रसायन मंत्रालय, आरोग्य मंत्रालय, नीती आयोग मिळून काम करत आहेत.  देशात अडीच लाख कोटी रुपयांचा आैषध उद्योग आहे. आैषध विक्रीच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या स्थानावर आहे.

 

आैषध आणि रसायन कायद्यानुसार आैषधाचा दर्जा निम्न असणे, विनापरवाना आैषध निर्मिती अथवा नकली आैषध असल्यास आैषध विकणाऱ्या कंपनीवर कोणतीही जबाबदारी नसते. जी कंपनी याचे उत्पादन करते तिच्यावर याची जबाबदारी आहे. ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स अॅक्टनुसार शिक्षा किंवा दंड निर्माता कंपनीला असतो. आता कायद्यात बदल करून आैषध निर्माता आणि विपणन कंपनीवरही जबाबदारी टाकली जाईल. हा प्रस्ताव आरोग्य मंत्रालयाकडे आहे.  

 

निर्माता कंपनी इतर कंपन्यांचे पॅकेजिंग करते  
आैषध निर्माता कंपनीकडे मिळालेल्या दस्तऐवजावरून लक्षात आले की, निर्माता कंपनीच मार्केटिंग करणाऱ्या कंपनीचे नाव आणि किंमत आैषधाच्या पाकिटावर लिहिते. मार्केटिंग कंपनीने सांगितलेल्या जागेवर आैषध पोहोचवण्याचे कामही निर्माता कंपनी करते. केवळ कंपनीचे नाव बदलल्याने आैषधाची किंमत कैक पटींनी वाढते.

 

पुढील स्लाईडवर पहा, बाजारात येताच अनेक पटींनी किमतीत वाढ...

 

 

बातम्या आणखी आहेत...