आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पकोड्याचा धडा: एकेकाळी 50 रुपयांत चालवायचा घर, आता रोल्स रॉइस अन् 440 कारचा मालक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कधीकाळी घरखर्च भागवण्यासाठी रमेश बाबूंनी केस कापण्यापासून ते पेपर वाटण्यापर्यंतची कामे केली. - Divya Marathi
कधीकाळी घरखर्च भागवण्यासाठी रमेश बाबूंनी केस कापण्यापासून ते पेपर वाटण्यापर्यंतची कामे केली.
नुकतेच पकोडे विक्रीवरून जोरदार राजकारण झाले. या राजकारणाने जे हातगाडी लावून पोट भरतात वा काही वेगळा व्यवसाय करतात अशांचा अपमान केला. कोणतेही काम लहान नसते, याचेच उदाहरण आहे देशातील सर्वात श्रीमंत न्हावी रमेश बाबू. DivyaMarathi.Com त्यांची सक्सेस स्टोरी आपल्या वाचकांना सांगत आहे. 
 

नवी दिल्ली - बंगळुरूतील रमेश बाबू यांचा जातिवंत न्हाव्याचा व्यवसाय असला तरी ते देशातील अब्जाधीशांपैकी एक आहेत. इतकेच नव्हे, रमेश आपल्या तीन कोटी रुपयांच्या रोल्स रॉयस कारमध्ये बसून सलूनमध्ये येतात. रमेश यांच्याकडे रोल्स रॉयससह मर्सिडीझ, बीएमडब्ल्यू व ऑडीसारख्या लक्झरी कार आहेत. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे रमेश यांच्या सलूनमध्ये ग्राहकांकडून केस कापण्याचे केवळ 100 रुपये आकारले जातात.

 

> रतन टाटा, मुकेश अंबानी, मार्क झुकरबर्गसारख्या बड्या हस्तींना आख्खे जग ओळखते. परंतु, जगाच्या पाठीवर अशा काही व्यक्ति आहेत की, त्यांनी स्वत:चा मेहनतीवर यशाचे उच्च शिखर गाठले आहे. बंगळुरु येथील रहिवासी रमेश बाबू हे त्यापैकी एक आहेत.

 

> रमेश बाबू यांचे एके काळात व्हाव्याचे दुकान होते. परंतु आपली दूरदृष्टी आणि परिश्रमाच्या जोरावर ते आज अब्जाधीश बनले आहेत. रमेश बाबूंकडे आज सगळं काही आहे. मात्र, ते आजही लोकांचे केस कापतात. रमेश बाबू यांचे स्वत:चे सलून आहे. बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांसारखे अनेक बडे क्लायंट आहेत.

 

पुढील स्लाइडवर वाचा, रमेश बाबूंचा प्रेरणादायी खडतर प्रवास...

बातम्या आणखी आहेत...