आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नायडूंवर 6 महिन्यांत तिसऱ्यांदा भेदभावाचा आरोप, विरोधी पक्षाचा राज्यसभेत सभात्याग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- विरोधी पक्षांनी मंगळवारी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्यावर भेदभावाचा आरोप केला. जनहिताशी संबंधित मुद्द्यांना सभागृहात मांडू देत नाहीत, असा त्यांचा नायडूंवर आरोप आहे. त्याच्या विरोधात विरोधी पक्षांनी मंगळवारी दिवसभरासाठी राज्यसभेच्या कामकाजावर बहिष्कार घातला. त्यात काँग्रेस, समाजवादी पार्टी, माकप, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक इत्यादी पक्षांच्या नेत्यांचा समावेश होता. नायडू यांनी मात्र विरोधकांच्या आरोपांचे खंडन केले आहे. सभागृहाच्या नियमांप्रमाणे कामकाज करणे हे माझे काम आहे. सभागृहाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना मी रोखणार आहे. भलेही त्यात सत्ता पक्षातील किंवा विरोधी पक्ष असो. व्यंकय्या नायडू गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये उपराष्ट्रपती झाले. त्यानंतर विरोधी पक्षाने त्यांच्यावर भेदभावाचा आरोप करण्याची ही तिसरी वेळ आहे.  


राज्यसभेत विरोधी नेते गुलाम नबी आझाद म्हणाले, सभापती आम्हाला लोककल्याणाच्या मुद्द्यावर सभागृहात बोलू देत नाहीत. हे योग्य नाही. सभापतींनी नियमानुसार सदनाचा कारभार चालवला पाहिजे. परंतु असे होताना दिसत नाही. कामकाजाच्या या पद्धतीमुळे विरोधी पक्षाचा आवाज दडपला जात असल्याचे सपा नेते नरेश अग्रवाल यांनी सांगितले.  

 

मी नियमांनुसार सभागृहाचे कामकाज चालवतो : व्यंकय्या नायडू  

> डिसेंबर २०१७  सभापती नायडू यांनी जदयूचे माजी अध्यक्ष शरद यादव व अली अन्वर यांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द केले होते. तेव्हा त्यांच्यावर विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांच्या प्रभावाखाली येऊन निर्णय घेतल्याचा आरोप केला होता.  

 

 

> ऑगस्ट २०१७  देशातील अनेक भागात दलितांच्या शोषणाचे मुद्दे उपस्थित करताना बसपा नेत्या मायावती यांनी सभापतींवर पक्षपाताचा व बोलू न देण्याचा आरोप केला होता. नंतर त्यांनी राजीनामा दिला होता. 

 

माजी सभापती हमीद अन्सारी यांच्यावर दोन्ही पक्षांचे आरोप  

फेब्रुवारी २०१७ - सभागृहात तत्कालीन सभापती हमीद अन्सारी यांच्यावर सत्ताधारी पक्षाने नकारात्मक वातावरण निर्माण करणे व विरोधी पक्षाने पक्षपाताचा आरोप केला होता. त्यावर अन्सारी खुर्चीवरून उठून गेले होते.

 

नायडू विविध मुद्द्यांवर मोकळे बोलतात..
सामान्यपणे पूर्वी उपराष्ट्रपती सभापती म्हणून सदनात किंवा सदनाबाहेर राजकीय मुद्द्यावर खूप कमी बोलताना दिसत. नायडू यांनी उपराष्ट्रपती ही संकल्पना बदलून टाकली आहे. चर्चेतील मुद्द्यांवर ते मोकळेपणाने मत मांडतात. पद्मावती, पाकिस्तानच्या मुद्द्यांवरही त्यांनी मत मांडले होते.


आणि कोण काय म्हणाले..
तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ब्रायन म्हणाले, सभागृहात आणि बाहेर लोकशाहीची हत्या होत आहे. अशा पद्धतीने सभागृह चालत नसते, असे आप नेते संजय सिंह यांनी म्हटले आहे.

 

भाजपचा मित्रपक्ष टीडीपीची लोकसभेत निदर्शने

 

सत्तारूढ भाजपचा मित्रपक्ष तेलगू देसम पार्टीच्या(टीडीपी) खासदारांनी मंगळवारी लोकसभेत विशेष पॅकेज देण्याची मागणी करत सभापतींसमोरील हौद्यात उतरून निदर्शन केले व घोषणा दिल्या. टीडीपी खासदार म्हणाले, आंध्र प्रदेशच्या विभाजनावेळी केंद्र सरकारने विशेष पॅकेज देण्याची घोषणा केली होती,त्याची अद्याप पूर्तता झाली नाही. यावर संसदीय कामकाज मंंत्री व भाजप नेते अनंत कुमार म्हणाले, टीडीपीच्या सदस्यांना विनंती करतो की त्यांची मागणी खूप संवेदनशील आहे. केंद्र सरकार आंध्र प्रदेशच्या विकासाबाबत खूप संवेदनशील आहे. त्यांच्या मागणीचा विचार केला जाईल. अनंत कुमार यांनी टीडीपी, बीजेडी, टीएमसी व वायएसआरसीपी पक्षांना मदतीची विनंती केली.

 

बातम्या आणखी आहेत...