आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेवाणीचा दिल्लीत हुंकार, मोदी सरकारवर हल्लाबोल; कोरेगाव भीमा प्रकरणात आपल्यावरच गुन्हा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- गुजरातचे दलित आमदार जिग्नेश मेवाणी यांनी दिल्लीत मोदी सरकारवर हल्लाबोल केला. आज लोकशाही व संविधानाला मोठा धोका निर्माण झाला आहे. त्याला वाचवण्यासाठीचा लढा संसदेपासून सडकेपर्यंत न्यावा लागेल, असे मेवाणी म्हणाले. 


उत्तर प्रदेशात भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद ‘रावण’ यांच्या सुटकेच्या मागणीसाठी ४० पेक्षा जास्त संघटनांनी युवा हुंकार रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना मेवाणी यांनी देश मनुस्मृतीने चालेल की घटनेने?  असा सवालही केला. तसेच त्यांनी दलित व आदिवासींवरील अत्याचार, शेतकरी आत्महत्या, विद्यार्थी नेत्यांविरुद्ध दाखल गुन्हे आणि तरुणांच्या बेरोजगारीवरूनही मोदींना अनेक सवाल केले.

 

कोरेगाव भीमा प्रकरणात आपल्यावरच गुन्हा
कोरेगाव भीमा हिंसाचाराला जबाबदार लोकांना अटक करण्याऐवजी सरकारने उलट माझ्याविरुद्धच हिंसाचाराला चिथावणी देण्याचा गुन्हा दाखल केल्याचे मेवाणींनी सांगितले. गुजरातेत भाजपला ९९ जागांवर गुंडाळून मोदींचे गर्वहरण केल्यामुळेच टार्गेट केले जात असल्याचाही आरोप त्यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...