आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरीबांसाठी सुरू केलेल्या योजनांची काँग्रेसकडून थट्टा केली जाते; एक्सप्रेसवे उद्घाटनात मोदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी निजामुद्दीन येथे दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवे आणि त्याच्याच 3डी मॉडेलचे उद्घाटन केले. तसेच पंतप्रधानांनी खुल्या जीपमध्ये 6 किमींचा रोड शो सुरू केला. येथून मोदी उत्तर प्रदेशच्या बागपतला जाऊन ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेसवे (ईपीई) चे उद्घाटन केले. ईपीई देशातील पहिले स्मार्ट   आणि सोलार एनर्जीयुक्त एक्सप्रेसवे आहे.  या उद्घाटन प्रसंगी पीएम मोदींनी काँग्रेसचाही समाचार घेतला. आपले सरकार गरीबांसाठी योजना आणत असताना काँग्रेस त्या योजनांची थट्ट करत आहे असे मोदी म्हणाले आहेत.

 

 

आमचे सरकार काम करत आहे - मोदी
- मोदी म्हणाले, "मे महिन्याच्या तडपत्या उन्हातही भर दुपारी इतक्या मोठ्या संख्येने लोक आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी येतात. अर्थात, सरकारने निश्चितच काम केले आहे. आज भाजप एनडीए सरकारने 4 वर्षे पूर्ण केली आहेत. या निमित्ताने मी आपला प्रधानसेवक आपल्या समोर नतमस्तक होऊन सव्वाशे कोटी जनतेला प्रणाम करत आहे."
- "आजचा दिवस दिल्ली एनसीआरच्या लोकांसाठी खूप मोठा आहे. आज दोन योजनांचे उद्घाटन झाले. ईस्टर्न पेरिफेरल एक्स्प्रेसवेवर 11 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत."
- "नवीन रस्त्यावर मी स्वतः प्रवास केला. त्यात आलेल्या अनुभवावरून आता सामान्य लोकांचे प्रवास किती सुकर झाले याची प्रचिती आली. केवळ 18 महिन्यांमध्ये हे काम पूर्ण झाले आहे."
- "आजच 14 पदरी 9 किमी लांब अशा रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले आहे. दिल्लीच्या पटपडगंज, मयूर विहार, वैशाली आणि नोएडाच्या लोकांना याची खरी जाणीव होईल. दिल्ली ते मेरठचा प्रवास आता अवघ्या 40 ते 45 मिनिटांत पार होईल."


दिल्ली ते मेरठ आता फक्त 45 मिनिटांत
दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवे 96 किलोमीटर लांब आहे. हे बनवण्यासाठी 841 कोटींचा खर्च आला आहे. यातून दोन्ही शहरांमध्ये अंतर अवघ्या 45 मिनिटांत पूर्ण करता येईल. दिल्ली ते मेरठ आणि पश्चिमेकडील उत्तर प्रदेशला जाण्यासाठी लोक ट्रॅफिक जॅमने त्रस्त होता. त्यांना हा एक्सप्रेसवे खूप मोठा दिलासा ठरणार आहे. 


सोलार एनर्जीने प्रकाशमान होणार ईपीई
ईपीई 135 किलो मीटर लांब आहे. हरियाणाच्या सोनीपत आणि पलवलला हा मार्ग जोडतो. याच्या निर्मितीसाठी 11 हजार कोटींचा खर्च आला आहे. यावर 4 सोलार प्लांट लावण्यात आले आहेत. रात्री येथील पथदिवे सौर ऊर्जेवर चालणार आहेत. 


दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवेची वैशिष्ट्ये
- या एक्सप्रेसवेवर बनलेल्या यमुना ब्रिजच्या दोन्ही दिशेला सौर ऊर्जा यंत्रणा आहे. व्हर्टिकल गार्डन, सोलाप पॉवर प्लांट सिस्टिम आणि ड्रिप सिंचनाची व्यवस्था असलेले हे देशातील पहिलेच एक्सप्रेसवे आहे. 
- हा एक्सप्रेसवे 6 पदरी आहे. त्याच्या दोन्ही बाजूंना 2.5 मीटर रुंद असे सायकलिंग ट्रॅक आहे. तसेच फुटपाथसाठी 1.5 मीटर रुंद ट्रॅक आहे. 
- एक्सप्रेसवेचा पहिला टप्पा निजामुद्दीन ते उत्तर प्रदेश गेट, दूसरा टप्पा उत्तर प्रदेश गेट ते डासना, तिसरा टप्पा डासना ते हापूड आणि चौथा टप्प डासना ते मेरठ असा बांधला आहे. याचे संपूर्ण बांधकाम रेकॉर्ड 17 महिन्यांत पूर्ण झाले आहे. 

- उल्लेखनीय बाब म्हणजे, काही दिवसांपूर्वीच या एक्सप्रेसवेच्या उद्घाटनात होणाऱ्या विलंबावरून सुप्रीम कोर्टाने भारतीय महामार्ग प्राधिकरणाला फटकारले होते. तसेच 1 जून पर्यंत ते उघडण्याचे निर्देश देखील दिले होते. 

बातम्या आणखी आहेत...