आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 ऑगस्टपासून सुरू होणार ‘मोदीकेअर’ योजना?सर्वात मोठी आरोग्य सुरक्षा योजना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली -  देशातील १० कोटी गरीब कुटुंबांना ५ लाखांचे आरोग्य विमा संरक्षण देणारी ‘मोदीकेअर’ ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना कॅशलेस असेल. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. सूत्रांनुसार, १५ ऑगस्ट किंवा २ ऑक्टोबरपासून योजना सुरू होण्याची शक्यता आहे. यासाठी १० ते १२ हजार कोटी खर्च येईल.


या योजनेत कुटुंबनिहाय १००० ते १२०० रुपयांचा हप्ता सरकार भरेल. ४०% लोकसंख्येला लाभ होईल. या आरोग्यविषयक योजनेची घोषणा जेटली यांनी गुरुवारी अर्थसंकल्पात केली होती.

 

अशी असतील वैशिष्ट्ये
-  सरकारी व निवडक खासगी रुग्णालयांत उपचारांची सुविधा.
-  सर्व उपचार मोफत होतील, योजना पूर्णपणे कॅशलेस.
-  सध्या २ हजार कोटींची तरतूद, गरज पडल्यास रक्कम वाढवणार.
-  कुटुंबातील सदस्यांची मर्यादा नाही, सर्व रोगांवर उपचार.
-  कालांतराने उर्वरित कुटुंबांनाही देणार योजनेचा लाभ.
बातम्या आणखी आहेत...