आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच इंडोनेशियात दाखल, चार वर्षांतील त्यांचा 81 वा परदेश दौरा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी तीन देशांच्या पाचदिवसीय दौऱ्याच्या पहिल्या दिवशी इंडोनेशियाला पोहोचले. हा त्यांचा पहिला इंडोनेशिया दौरा आहे. ते येथे दोन दिवस थांबतील. यादरम्यान व्यवसाय, संरक्षण क्षेत्राशी संबंधित द्विपक्षीय चर्चा होईल. ३१ मे रोजी ते मलेशियाला जातील, तेथे ते नवनिर्वाचित पंतप्रधान महातीर मोहंमद यांचे अभिनंदन करतील. मलेशियाहून मोदी सिंगापूरला रवाना होतील. हा मोदींचा दुसरा सिंगापूर दौरा आहे.

 

ते २०१५ मध्ये तेथे गेले होते. मोदी तेथे दोन दिवस राहतील. त्यात व्यवसाय, संरक्षण संबंध मजबूत करण्यासह इतर मुद्द्यांवर चर्चा करतील. मोदींच्या या तीन दिवसांच्या दौऱ्याला ‘आग्नेय आशिया संपर्क मोहीम’ मानली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, मोदींच्या या देशांच्या दौऱ्याचे दोन हेतू आहेत. पहिला-चीनकडून मिळणाऱ्या आव्हानाची तयारी आणि दुसरा व्यवसाय व संरक्षणाच्या क्षेत्रात भागीदारी वाढवणे. मोदींचा हा या वर्षातील सातवा विदेश दौरा आहे. मोदी या वर्षी १४ देशांत १८ दिवस राहिले आहेत. पंतप्रधान झाल्यानंतर आतापर्यंत चार वर्षांत मोदींनी ८० विदेश दौरे केले आहेत. ते ५४ देशांत गेले आणि १३५ दिवस राहिले.  

 

इंडोनेशियात १ लाख भारतीय  
* इंडोनेशियाशी २००५ मध्ये व्यूहात्मक भागीदारीची सुरुवात झाली होती.  
* तेथे एक लाखापेक्षा जास्त भारतीय राहतात. मोदी त्यांना संबोधित करतील.  
* आग्नेय आशियात इंडोनेशिया भारताचा सर्वात मोठा भागीदार आहे. वार्षिक १.२२ लाख कोटी रु.चा व्यवसाय होतो.  

 

मलेशियात २० लाख भारतीय 
* मलेशियाशी ७१ वर्षांपूर्वी राजनयिक संबंधांची सुरुवात झाली. २०१० मध्ये व्यूहात्मक भागीदारीसाठी पाऊल.  
* सध्या दोन्ही देशांत १ लाख कोटी रुपयांचा व्यवसाय होतो. तेथे २० लाखांपेक्षा जास्त भारतीय राहतात.  
* मोदी गुरुवारी तेथे काही तास राहतील.  

 

सिंगापूरमध्ये ८ लाख भारतीय  
* सिंगापूर भारतासाठी महत्त्वाचा, कारण तेथे ८ लाख भारतीय राहतात. हजार भारतीय कंपन्या नोंदणीकृत.  
* दोन्ही देशांत सध्या १.२ लाख कोटींचा वार्षिक व्यवसाय होतो.  
*  अपेक्षा : व्यवसाय वृद्धी, चीनचा पर्याय बनण्याच्या संधींचा शोध शक्य.  

 

 

चीनच्या सागरी रेशीम मार्गाला इंडोनेशियामार्फत भारत देणार उत्तर  

१९९१ मध्ये लूक ईस्ट पॉलिसी तयार झाली होती. मोदी सरकारने ती अॅक्ट ईस्टमध्ये रूपांतरित केली. मोदींच्या या दौऱ्याच्या केंद्रस्थानी चीन आहे. चीनचा एक नवा सागरी रेशीम मार्ग आहे, तो इंडोनेशियाच्या मलक्काहून आफ्रिकेच्या जिबुतीपर्यंत जातो. म्हणजे हा मार्ग भारताला घेरतो. भारत इंडोनेशियाशी असाच करार करणार आहे, त्यामुळे दोन्ही देशांत व्यवसाय-संरक्षण मार्ग बनेल. त्याद्वारे आपण चीनच्या सागरी रेशीम मार्गाला प्रत्युत्तर देऊ शकू. त्याशिवाय चीन पाक, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार, फिलिपाइन्सवर लक्ष ठेवून आहे. इंडोनेशिया आपल्यासोबत आला तर आपण अंदमान-निकोबारजवळ चीनला रोखू शकतो. मोदी इंडोनेशियाहून सिंगापूरला जातील. त्याचा हेतूही स्पष्ट आहे. पूर्व आशियात चीनसमोर सिंगापूरच मोठे आव्हान आहे. त्याच्याशी करार झाल्यावर आपले चीनवरील अवलंबित्व कमी होईल.  

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...