आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माेनिका सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन, ज्याेती दुसऱ्या स्थानी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- नाशिकची सुपरस्टार युवा धावपटू माेनिका अाथरे सलग दुसऱ्या वर्षी दिल्ली मॅरेथाॅनमध्ये चॅम्पियन ठरली. तिने उल्लेखनीय कामगिरी करताना महिलांच्या गटामध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. तिने २ तास ४३ मिनिटे ४६ सेकंदांमध्ये मॅरेथाॅन पूर्ण केली.  या गटात परभणीच्या ज्याेती गवतेने राैप्य अाणि नागपूरच्या  माेनिका राऊतने कांस्यपदक पटकावले.   
 
पुरुष गटामध्ये गाेपी थाेनाकाल सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. त्याने २ तास १५ मिनिटे १६ सेकंदांत अंतर पूर्ण केले. या गटात नितेंद्र रावतने राैप्य अाणि बहादूरसिंग धाेनीने कांस्यपदकाची कमाई केली.   
 
राष्ट्रकुल प्रवेशाचा प्रयत्न अपयशी
अाॅस्ट्रेलियामध्ये हाेणाऱ्या अागामी एप्रिलमध्ये हाेणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेतील प्रवेश निश्चित करण्याचा माेनिका अाथरे अाणि गाेपी थाेनाकालचा प्रयत्न अपयशी ठरला. या दाेघांनाही या स्पर्धेसाठीची पात्रता पुर्ण करता अाली नाही. गत वर्षी सुवर्णपदक जिंकून माेनिकाने वर्ल्ड चॅम्पियनशिपची पात्रताही पुर्ण केली हाेती. मात्र, यंदा असा दुहेरी याेग जुळवून अाणण्याचा तिचा प्रयत्न अपुरा ठरला. 
 
महाराष्ट्रीयन मुलींचा दबदबा
दिल्लीच्या मॅरेथाॅनमध्ये महाराष्ट्राच्या तीन युवा धावपटूंनी महिला गटात अापला दबदबा कायम ठेवला. यात माेनिका अाथरेसह ज्याेती गवते अाणि नागपूरच्या माेनिका राऊतचा समावेश अाहे. या तिघींनीही टाॅप-३ मध्ये स्थान मिळवून पदकांची कमाई केली. माेनिकाने  दुसऱ्या वर्षी अव्वल राहताना सुवर्णपदकावरचे अापले वर्चस्व अबाधित ठेवले. ज्याेती, माेनिका राऊतही पदकाच्या मानकरी ठरल्या.   
 
हेही महत्त्वाचे
- पहाटे ४.३० वाजता मॅरेथाॅनला सुरुवात  
- सचिनने दाखवली हिरवी झेंडी   
- ६५ अव्वल भारतीय धावपटू सहभागी  
- गुडघ्याच्या दुखापतीनंतरही माेनिका अाथरेने राखले वर्चस्व
 
 
पदकविजेते (पुरुष व महिला) 
२ तास १५ मिनिटे १६ से. - सुवर्ण - गाेपी थाेनाकाल  
२ तास २४ मिनिटे ५५ से. - राैप्य - नितेंद्र रावत  
२ तास २४ मिनिटे ५६ से. - कांस्य - बहादूरसिंग धाेनी  
२ तास ४३ मिनिटे ४६ से. - सुवर्ण - माेनिका अाथरे 
२ तास ५० मिनिटे  १२ से. - राैप्य - ज्याेती गवते  
२ तास ५५ मिनिटे ०२ से. - कांस्य - माेनिका राऊत 
बातम्या आणखी आहेत...