आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मुझफ्फरनगर : द बर्निंग लव्ह’वर बंदी नाही : उत्तर प्रदेश सरकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- ‘मुझफ्फरनगर : द बर्निंग लव्ह’ या चित्रपटावर राज्यातील कुठल्याही जिल्ह्यात बंदी नाही, अशी माहिती उत्तर प्रदेश सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात दिली. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर आणि डी. वाय. चंद्रचूड यांच्या न्यायपीठासमोर आलेल्या एका याचिकेच्या सुनावणीत राज्य सरकारने ही माहिती दिली.


मुझफ्फरनगर, मेरठ, शामली, सहारनपूर, बागपत आणि गाझियाबाद या जिल्ह्यांत हा चित्रपट प्रदर्शित करू नये, असे तोंडी आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. ‘मुझफ्फरनगर : द बर्निंग लव्ह’ हा चित्रपट मुझफ्फरनगरमध्ये २०१३ मध्ये झालेल्या दंगलीच्या पृष्ठभूमीवर एक हिंदू मुलगा आणि मुस्लिम मुलगी यांच्या प्रेमकथेवर आधारित आहे.


प्रशासनाने चित्रपटाच्या प्रदशर्नावर बंदी घालण्याचा कुठलाही आदेश दिला नाही आणि आजही तो चित्रपटगृहांत दाखवला जात आहे, हे राज्य सरकारच्या वकिलाचे वक्तव्य सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले आहे. जर चित्रपट निर्माता आणि वितरकांना चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी पोलिसांची गरज भासली तर त्यांना ती दिली जाईल, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका निकाली काढली.

बातम्या आणखी आहेत...