आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली/रामल्ला - पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी पॅलिस्टाइनची राजधानी रामल्ला येथे पोहोचले. येथे त्यांना प्रेसिडेंशियल हेडक्वॉर्टर अल-मुक्ता येथे गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्यानंतर पंतप्रधानांनी पॅलिस्टाइनचे माजी राष्ट्रपती यासर अराफात यांना श्रद्धांजली वाहिली. मोदी पॅलिस्टाइनचे पंतप्रधान डॉ. रामी हमदल्लाह आणि राष्ट्रपती महमूद अब्बास यांची भेट घेणार आहेत. मोदी सध्या 3 आखाती देशांच्या - पॅलेस्टाइन, यूनायटेड अरब अमिरात (यूएई) आणि ओमानच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी ते जॉर्डनमध्ये होते. मोदींचा हा दौऱ्या अनेक अर्थाने महत्त्वाचा मानला जात आहे. यूएईमध्ये त्यांच्या हस्ते एका मंदिराचे भूमीपूजन होणार आहे. याशिवाय ओमानमध्ये 100 वर्षे जुन्या शिवालय मंदिराचे ते दर्शन घेणार आहेत. त्यासोबतच मशिदीतही जाणार आहेत. या दौऱ्यात मोदी आखाती देशांसोबत अनेक महत्त्वाचे दौरे करणार आहेत.
येरुशलमपासून 8 किलोमीटर दूर रामल्ला
- जगातील सर्वात वादग्रस्त जागा येरुशलमपासून रामल्ला हे ठिकाण फक्त 8 किलोमीटर अंतरावर आहे.
- गेल्यावर्षी अमेरिकेने येरुशलम शहराला इस्त्रायलची राजधानी घोषित केले होते. त्यानंतर अनेक देशांनी अमेरिकेच्या या निर्णयाला विरोध केला होता. भारताने यूएनमध्ये या निर्णयावर पॅलिस्टाइनला साथ दिली होती.
पॅलेस्टाइन - इस्त्रायल : दोघांसोबत भारतेच चांगले संबंध
- पॅलिस्टाइनला जाणारे मोदी भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. गेल्यावर्षी जुलैमध्ये ते इस्त्रायलच्या दौऱ्यावर होते. या देशाचाही भारतीय पंतप्रधानांनी प्रथमच दौरा केला होता. परराष्ट्र व्यवहारातील तज्ज्ञांचे मत आहे की भारत आपले परराष्ट्र धोरण बदलत आहे. त्यामुळेच आता पॅलिस्टाइनसारख्या जुन्या मित्राची चिंता नाही.
- पॅलिस्टाइनच्या दौऱ्याने मोदींनी हे गृहितक मोडित काढण्याच प्रयत्न केला आहे. त्यांनी परराष्ट्र धोरणातही 'सबका साथ - सबका विकास' हे धोरण ठेवले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.