आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनतेच्या पैशांची लूट सहन केली जाणार नाही, PNB-नीरवचा नामोल्लेख टाळून PM मोदींचे घोटाळ्यावर भाष्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीएनबी आणि नीरव मोदीचा नामोल्लेख टाळून मोदींनी आर्थिक गैरव्यवहार सहन केले जाणार नसल्याचे म्हटले आहे. - Divya Marathi
पीएनबी आणि नीरव मोदीचा नामोल्लेख टाळून मोदींनी आर्थिक गैरव्यवहार सहन केले जाणार नसल्याचे म्हटले आहे.

नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बँकेतील 11,356 कोटींचा घोटाळा उघड होऊन एक आठवडा उलटून गेल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन सोडले आहे. मोदी म्हणाले, 'जनतेचा पैशांची लूट सरकार सहन करणार नाही. आर्थिक व्यवहारात अनियमीतेतविरोधात सरकार कडक कारवाई करत आहे आणि यापुढेही करत राहिल.'  मात्र मोदींनी आपल्या संपूर्ण भाषणात कुठेही पीएनबी किंवा नीरव मोदीचा उल्लेख केला नाही. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह विरोधीपक्षाच्या नेत्यांनी आरोप केला होता की मोदी पीएनबी घोटाळा करणाऱ्या नीरव मोदीवर शांत आहेत. सीपीएम नेते सीताराम येचुरींनी नरेंद्र मोदींना मौनेंद्र मोदी म्हटले होते. 

 

वित्तीय संस्थांना मोदी म्हणाले- जबाबदारीने काम करा 
- ग्लोबल बिझनेस समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सायंकाळी सहभागी झाले होते. यावेळी ते म्हणाले, 'आर्थिक व्यवहारातील अनियमितेविरोधात सरकार कडक कारवाई करेल आणि यापुढेही करत राहिल. जनतेच्या पैशांची लूट सरकार सहन करणार नाही.'
- वित्तीय संस्थांना मोदींनी आवाहन केले की त्यांनी जबाबदारीने काम केले पाहिजे. नियम आणि नीतिमत्तेने संस्थांनी आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. 


काय आहे पीएनबी घोटाळा?
- पंजाब नॅशनल बँकेने काही दिवसांपूर्वी सेबी आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज यांना बँकेत 11,356 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची माहिती दिली होती. पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील ब्रेडी हाऊस शाखेत हा घोटाळा झाला होता. या घोटाळ्याची सुरुवात 2011 मध्ये झाली होती. 8 वर्षांमध्ये हजारो कोटी रुपये बनावट लेटर ऑफ अंडरटेकिंगच्या (LoU) माध्यमातून विदेशी बँकांच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करण्यात आले होते. 
- पंजाब नॅशनल बँकेच्या बनावट LoU द्वारे हिरे व्यापारी नीरव मोदी आणि गीतांजली जेम्सचा मालक मेहुल चौकसी यांनी हा घोटाळा केल्याचा आरोप आहे. मोदी आणि चौकसीवर आरोप आहे की त्यांनी बँकेच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा घोटाळा केला. 
- केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आतापर्यंत 12 जणांना अटक केली आहे. यात पीएनबीचे पाच अधिकारी आहेत. अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) या घोटाळा प्रकरणी नीरव मोदी आणि मेहुल चौकसी यांच्या देशभरातील शोरुम्सव छापेमारी केली आहे. नीरवच्या लक्झरी कार आणि मालमत्ता जप्त करण्याचे काम गेल्या 10 दिवसांपासून सुरु आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...