आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राफेल डीलवर मोदींचे मौन का? राहुल गांधींचा पंतप्रधानांना सवाल, विरोधकांनी दिल्या या 10 घोषणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोकसभेत मोदींनी जवळपास दीड तास भाषण केले. - Divya Marathi
लोकसभेत मोदींनी जवळपास दीड तास भाषण केले.

नवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत 1 तास 30 मिनिटांचे भाषण केले. यावेळी विरोधीपक्षाकडून जोरदार घोषणाबाजी आणि त्यांच्या भाषणात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. विरोधकांनी 'जुमलेबाजी बंद करो', 'झुठा भाषण बंद करो' सारख्या 10 घोषणा त्यांच्या दीड तासांच्या भाषणादरम्यान अखंडपणे दिल्या. पंतप्रधानांच्या भाषणानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी राफेल डीलवरुन मोदींवर आरोप केला की ते भ्रष्टाचाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.  सभागृहात काँग्रेससोबत NDA चा सहकारी पक्ष TDP सदस्यही विरोधीपक्षांच्या सूरात सूर मिसळत घोषणाबाजी करताना दिसले. टीडीपीने आंध्र प्रदेशाच्या नावाने सुरु असलेला ड्रामा बंद करा अशा घोषणा दिल्या.

 

विरोधकांनी दिल्या या 10 घोषणा 
1) जुमलेबाजी बंद करो.
2) झूठा भाषण बंद करो. 
3) मॅच फिक्सिंग बंद करो. 
4) आंध्र प्रदेश के मुद्दे पर ड्रामा बंद करो. 
5) धमकाना बंद करो. 
6) स्पेशल पॅकेज का क्या हुआ? 
7) झांसा देना बंद करो.
8) 15 लाख का क्या हुआ? 
9) ये ड्रामेबाजी बंद करो.
10) राफेल डील में क्या हुआ?

 

घोषणाबाजीचे नेतृत्व कोण करत होते
- सभागृहात फलक झळकवणे आणि घोषणाबाजी हे सर्वच विरोधीपक्षाचे सदस्य करत होते. यामध्ये सर्वाधिक आवाज होता तो काँग्रेसच्या खासदार सुष्मिता देव यांचा. 

बातम्या आणखी आहेत...