आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जस्टीस चंद्रचूड म्हणाले होते-SC ला मच्छिबाजार बनवू नका, मच्छिमार म्हणाले- वक्तव्य मागे घ्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 नवी दिल्ली/पुद्दुचेरी - सुप्रीम कोर्टात जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोर्टाला मच्छिबाजार बनवू नका अशी टिपण्णी केली होती. पण यावर मच्छिमार भडकले आहेत. मच्छिमारांची राष्ट्रीय संघटनला नॅशनल फिशरफोक फोरमने जस्टीस चंद्रचूड यांच्याकडे हे वक्तव्य मागे घेण्याची मागणी केली आहे. संघटनेने अशी विचारणाही केली आहे की, जस्टीस चंद्रचूड यांनी मच्छी बाजाराचा उल्लेख करण्याची गरज का पडली. तो इतका वाईट असतो का? यामुळे मच्छिमार समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत. जस्टीस चंद्रचूड यांनी जस्टीस लोया यांच्या मृत्यूवरील सुनावणीदरम्यान वकिलांच्या युक्तीवादाला त्रासून हे वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते, 'सुप्रीम कोर्टाला मच्छिबाजार बनवू नका. नॅशनल फिशरफोक फोरमचे अध्यक्ष एम इलांगा यांनी म्हटले की, माननीय जस्टीस चंद्रचूड यांचे वक्तव्य मच्छिमारांचा अपमान करणारे आहे. त्यामुळे आम्ही दुखावलो आहोत. कारण त्यांनी चुकीच्या पद्धतीने याचा वापरल केला आहे.  


प्रतिमा खराब होऊ नये 
- इलांगा म्हणाले, आम्हाला याच्याशी काही देणे घेणे नाही. पण न्यायाधीशांना मच्छिबाजाराचा उल्लेख करायची गरज का पडली? आम्ही एवढे वाईट नाही की आमची प्रतिमा एवढी खराब केली जावी. 
- सुप्रीम कोर्टाच्या माननीय न्यायाधीशांचा सर्व आदर करतात, पण त्यांचे वक्तव्य मच्छिमारांसाठी अपमानकारक आहे. जस्टीस चंद्रचूड यांनी त्याच व्यासपीठावरून हे असंसदीय शब्द मागे घ्यायला हवे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...