आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेताजींच्या मृत्यूविषयी गूढ नाही- अाशिष रे;विमान अपघातातच झाला होता सुभाषचंद्र यांचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे गूढ अद्यापही चर्चेचा विषय आहे. त्यांचे पुतणे आशिष रे यांनी आपल्या नव्या ‘लेेड टू रेस्ट’ पुस्तकात त्याविषयी लिखाण केले आहे. आपल्या पुस्तकातील मजकुराने कदाचित या वादावर पडदा पडेल, अशी अपेक्षा आशिष यांनी व्यक्त केली आहे. नेताजींच्या गूढ मृत्यूनंतर झालेल्या ११ विविध तपासांचे अहवाल पुस्तक लिहिताना संदर्भासाठी वापरले आहेत. १८ ऑगस्ट १९४५  रोजी तैपेई विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता, असा निष्कर्ष आशिष यांनी काढला आहे.  


आशिष रे यांचा दावा आहे की, त्यांचे पुस्तक नेताजींच्या मृत्यूच्या चर्चेसाठी ‘श्वेतपत्रिके’ प्रमाणे आहे. या पुस्तकाची प्रस्तावना नेताजींची कन्या अनिता बोस यांनी लिहिली आहे. सुभाषजींच्या मृत्यूचा वाद थांबवावा असे त्यांनी यात लिहिले आहे. अधिकृत तपास अहवाल आणि इतर गैरसरकारी स्रोतांचे निष्कर्ष जवळपास सारखेच आहेत. सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू विमान अपघातातच झाला होता, असे अनिता बोस लिहितात.

  
डिसेंबर २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेताजींच्या मृत्यूच्या तपासासंबंधी १०० दस्तावेज सार्वजनिक केले होते. नॅशनल अर्काइव्हज ऑफ इंडियात असलेल्या सर्व गोपनीय कागदपत्रांना त्यांनी उजेडात आणले. नेताजी ‘गुमनामी बाबा’ म्हणून  वावरत असल्याच्या वावड्या उठल्यानंतर आपण ‘लेड डू रेस्ट ’ पुस्तक लिहिण्याचे ठरवले. या सर्व अफवांवर पडदा टाकण्यासाठी आपण लिखाण केल्याचे आशिष रे सांगतात.  

७२ वर्षे वादंग का?  
नेताजींचे बंधू आणि गुरुस्थानी असलेले शरद बोस यांचा मृत्यू १९५० मध्ये झाला. ते या प्रकरणातील महत्त्वाचा धागा होते. त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूविषयी ठाम भूमिका न मांडल्याने हा मतभेद निर्माण झाला. तो आजतागायत सुरू आहे. या मृत्युप्रकरणी भारतात ४ वेळा, जपानमध्ये ३ , ब्रिटनद्वारे ३ आणि तैवानकडून १ वेळा चाैकशी झाली. या सर्व तपास अहवालांत विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याचे नमूद केलेले आहे. लंडन येथील निवासी असलेल्या आशिष यांनी येथील बिकानेर हाऊसमध्ये झालेल्या प्रकाशन समारंभातही ही माहिती दिली होती. जपानी वायुदलाच्या विमानात बिघाड झाल्याने ते अपघातग्रस्त झाले होते, असे आशिष रे यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...