आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नात मिळालेले गिफ्ट उघडताच झाला स्फोट, नवविवाहित तरुण आणि आजीचा मृत्यू, नवरी गंभीर जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सौम्य आणि रीमा यांचे 21 फेब्रुवारी लग्न झाले होते. - Divya Marathi
सौम्य आणि रीमा यांचे 21 फेब्रुवारी लग्न झाले होते.

भुवनेश्वर - ओडिशामधील बोलांगीर येथे लग्न सोहळ्यात मिळालेले गिफ्ट उघडताच स्फोट झाला आहे. नवविवाहित तरुण आणि त्याच्या आजीचा स्फोटात मृत्यू झाला असून नवविवाहिता गंभीर जखमी आहे. ही घटना शुक्रवारी घडली. नवविवाहित जोडप्याला 21 फेब्रुवारी रोजी झालेल्या लग्नात अज्ञात व्यक्तीकडून हे स्फोटक गिफ्ट मिळाले होते. स्फोट एवढा मोठा होता की रुममधील संपूर्ण साहित्य अस्ताव्यस्त झाले.

 

गिफ्ट बॉक्समध्ये दिला बॉम्ब 
- पाटनगड येथील पोलिस अधिकारी सेसादेब बारीहा यांनी सांगितले, की वधु-वराला कोणीतरी गिफ्ट बॉक्समध्ये बॉम्ब दिला होता. गिफ्ट बॉक्सवर रायपूर लिहिलेले होते. 
- 21 फेब्रुवारीला पाटनगड येथील रहिवासी सौम्य शेखर साहू याचे लग्न बौध जिल्ह्यातील रीमा साहूसोबत झाले होते. 
- नवविवाहित जोडप्याच्या रिसेप्शनमध्ये एका अज्ञात व्यक्तीने गिफ्ट बॉक्स दिला. सौम्य याने घरी आल्यानंतर आजीच्या रुममध्ये गिफ्ट उघडण्यास सुरुवात केली तेव्हा एका गिफ्ट बॉक्समध्ये स्फोट झाला. 
- स्फोट झाला तेव्हा सौम्य त्याची नवविवाहिता आणि आजी रुममध्ये होते. सौम्यचे वडील मुलीच्या घरी दिल्लीला गेले होते. सौम्यची आईही घरी नव्हीती. त्या कॉलेजमध्ये प्रिंसिपल आहेत. 

 

शेजाऱ्यांनी दिली पोलिसांना माहिती 
- स्फोट झाल्याची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. सौम्य त्याची पत्नी रीमा आणि आजीला गंभीर जखमी आवस्थेत पाटनगढ येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान आजीचा मृत्यू झाला. 
- सौम्यची स्थिती नाजूक असल्याने त्याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले मात्र रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. रीमाची प्रकृती गंभीर आहे. बॉम्बचे गिफ्ट कोणी दिले याचा शोध पोलिस घेत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...