आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात झाला बेल्जियन नागरिकाचा मृत्यू, मृतदेह घरी पोहाेचला तेव्हा हृदय आणि किडनी गायब

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- बेल्जियममधील डॅनी बेल्शियस(४८) यांचा दोन वर्षापूर्वी गुजरातमधील जामनगर येथे गूढ मृत्यू झाला. हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाल्याचे कारण देण्यात आले. परंतु त्यांचा मृतदेह बेल्जियमला पोहचला. तेथे पुन्हा शवविच्छेदन करण्यात आले.  तेव्हा डॅनीचे हृदय अाणि किडनी गायब असल्याचे सांगण्यात आले. या अवयवांना जोडणारी अॅड्रिनल ग्लँायड्स आढळले नाहीत.  शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळल्या.


या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी त्यांची पत्नी नॅन्सी वॉन सान लढा देत आहे. बेल्जियममध्ये या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. बेल्जिमयमधील खासगी गुप्तहेरांना भारतात येण्याची परवानगी मिळत नाही. बेल्जियमच्या अधिकाऱ्यांना गुजरातच्या गृहमंत्रालयाशी संपर्क साधण्याचे सांगण्यात आले. डॅनी यांचा खून झाला आहे की, मृत्यूनंतर त्यांचे अवयव काढून घेण्यात आले आहेत? याची माहिती बेल्जियमच्या अधिकाऱ्यांना हवी आहे.


दैनिक भास्करकडे या प्रकरणाची कागदपत्रे आहेत. नॅन्सी यांच्याशी संपर्क साधण्यात आला. तथापि, त्यांनी हे प्रकरण संवेदनशील असून आपण जास्त माहिती देऊ शकत नाही, असे सांगितले. त्यांचे वकिल अाणि या प्रकरणात लक्ष घालणारे वरिष्ठ पत्रकार डिर्क लीस्टमॅन्स यांच्याशी दीर्घ चर्चा झाली. त्या आधारे या घटनेची माहिती मिळत गेली.

 

ट्रेनिंगसाठी गुजरातमध्ये
एस्केलेटर तंत्रज्ञानात निपुण असलेले डॅनी ८ फेब्रुवारी २०१६ रोजी एका भारतीय कंपनीस विंड टेक्नाॅलॉजीचे प्रशिक्षण देण्यासाठी गुजरात आले होेते. जामनगरातील खंभालिया येथील एका हॉटेलात त्यांचा मुक्काम


 डॅनी हॉटेलात आले
कंपनीत ११ फेब्रुवारीला प्रशिक्षण सत्रात त्यांची प्रकृती बिघडली. छातीत दुखत असल्याचे सांगून ते हॉटेलात परतले. कंपनीच्या सहकाऱ्याने त्यांची प्रकृ़ती बिघडल्याचे पाहून डॉक्टरांना बोलावले.


उपचाराआधीच मृत्यू
डॉक्टरांनी तपासले. लगेच रुग्णालयात नेण्यास सांगितले. कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांनी त्यांना एका कारमधून खासगी रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी डॅनी अाधीच मृत असल्याचे म्हटले.


डॅनीचा मृतदेह शासकीय रुग्णालयात नेला
डॅनीचा मृतदेह शासकीय रुग्णालयात नेला. शवविच्छेदनात त्यांचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचा अहवाल देण्यात आला होता.  औपचारिकता पूर्ण करुन  मृतदेह बेल्जियमला पाठवला.

 

 

पुन्हा शवविच्छेदन करण्याचा निर्णय

बेल्जियममध्ये मृतदेहाचे पुन्हा शवविच्छेदन करण्यात आले. तेव्हा अहवाल धक्कादायक होता. मृत्यूचे कारण मारहाणीमुळे झाल्याचे म्हटले. डोक्यात खोल जखमा झाल्याचे म्हटले. यकृत फाटलेले होते आणि किडनी व हृदय गायब झाल्याचे आढळले. यामुळे मृत्यूचे गूढ वाढले. 

 

 

डॅनीचा मृत्यू नव्हे, खून

शवविच्छेदन अहवालाची दखल घेत बेल्जियममध्ये चौकशी समिती नेमण्यात आली. डॅनीचा मृत्यू हा खून असल्याचे सांगण्यात आले. बेल्जियम पोलिसांनी या प्रकरणी संबंधित लाेकांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. या प्रकरणात भारताकडून फारसे स्वारस्य दाखवण्यात येत नाही.  गुजरातमध्ये संपर्क करावा, असे गृहमंत्रालयाने म्हटले. 

 

यांची चौकशी करणे आहे
बेल्जियम पोलिस प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांशी चौकशी करू इच्छिते. कंपनीचे व्यवस्थापक, हॉटेलचे कर्मचारी, रुग्णालयातील डॉक्टर व कंपनीच्या ज्या कर्मचाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात नेले, यांची चौकशी करणार.

 

या अधिकाऱ्यांना चौकशी करायची आहे
बेल्जिमयने मागणी केली की, चौकशी करताना त्यांच्याकडील मुख्य पोलिस आयुक्त, सरकारी वकिल यांच्यासह दंडाधिकाऱ्यांनाही हजर राहण्याची परवानगी मिळावी.

 

चौकशीत हवी आहेत या प्रश्नांची उत्तरे

१. बेल्जियममध्ये दुसऱ्या शवविच्छेदन अहवालात समजले की, डॅनींच्या डोक्याला जखम त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव. ही जखम झाली कशी?
२. डॅनीच्या यकृताजवळ सुमारे ५ इंचाचा मोठा घाव होता. ते जिवंत होते तेव्हा रक्त खूप गेले. मग जखम झाली कशी?
३. शवविच्छेदनात हृदय, किडनी व त्यांना जोडणारी अॅड्रिनल ग्लांयड गायब असल्याचे आढळले. पहिल्या शवविच्छेदनात हे अवयव कसे होते?
४. भारतात शवविच्छेदनाचे फोटो अथवा व्हिडिओग्राफी होते का? ती माहिती मिळू शकते का?

 

 

बातम्या आणखी आहेत...